नवी दिल्ली, 26 एप्रिल : अँटी-कोविड लस न घेतलेल्या लोकांमुळे लसीकरण (Corona Vaccination) झालेल्यांना धोका निर्माण होत आहे. सोमवारी प्रकाशित झालेल्या मॉडेल अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधकांनी SARS-Cov-2 (Corona virus) सारख्या संसर्गजन्य रोगाचे परिणाम समजून घेण्यासाठी लस न घेतलेल्या आणि लसीकरण झालेल्या लोकांचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी लसीकरण झालेल्या आणि न झालेल्या लोकांच्या संपर्कात इतर लोकांना ठेवण्यात आले. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने बातमी दिली आहे.
टोरंटो विद्यापीठातील डाला लेन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डेव्हिड फिसमॅन म्हणाले की, लस अनिवार्य करण्यावर अनेक विरोधकांचे म्हणणे आहे की, ती घ्यायची की नाही हे ज्या-त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मात्र, लसीकरण न झालेल्या लोकांकडून लसीकरण करून घेतलेल्या लोकांना जास्त धोका असल्याचे आढळले आहे. हा अभ्यास 'कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे. लसीकरण न केलेले लोक एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्यांना जास्त धोका नसतो लसीकरण केलेल्या लोकांना धोका जास्त असतो.
हे वाचा - World Malaria Day: मलेरिया जीवघेणा ठरू शकतो; आयुर्वेदिक उपचारांनी अशी घ्या काळजी
त्यात असेही म्हटले आहे की, जेव्हा लसीकरण केलेले लोक लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये मिसळतात तेव्हा लसीकरणाचे प्रमाण जास्त असले तरीही लसीकरण केलेल्या लोकांमध्ये संसर्गाची अनेक नवीन प्रकार उद्भवू शकतात. बूस्टर डोस न मिळालेल्या आणि SARS-CoV-2 प्रकाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये लसीची प्रभावीता कमी असूनही, निष्कर्ष स्थिर दाखवले जातात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे निष्कर्ष कोरोना महामारीची नवीन लाट किंवा व्हायरसच्या नवीन स्वरूपाच्या वर्तनाशी देखील संबंधित असू शकतात. अभ्यासात असे म्हटले आहे की, लसीकरण न केल्याने केवळ लसीकरण न झालेल्यांनाच नाही तर त्यांच्या आसपासच्या लोकांनाही धोका निर्माण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona updates, Corona vaccination, Corona vaccine