मुंबई, 20 जानेवारी : मित्रमैत्रिणींसोबत एखादी छोटीशी पार्टी असेल आणि एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला गिटार वाजवता (guitarist) येत असेल तर मग काय त्या पार्टीची रंगत अधिकच वाढते आणि गिटारच्या तालावर जर सर्वांनी सूर धरला तर मग, क्या बात है! पण गिटारच्या तालावर असाच सूर जर एखाद्या पोपटानं (parrot) धरला तर. म्हणजे पोपटानं गाण गायलं (parrot singing) तर? तसं तर पोपट आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेच. त्याचं मिठू मिठू बोलणं प्रत्येकालाच आवडतं. पण त्याला सुरात गाताना कधी पाहिलं आहे. पोपट गात असल्याचा असाचा एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
If you’ve already seen a parrot singing Led Zeppelin today just keep on scrolling...https://t.co/UjewCOflIx
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) January 18, 2021
@RexChapman ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती हातात गिटार घेऊन तो वाजवतो. ही व्यक्ती म्हणजे या पोपटाची मालक असावी. कारण पोपट हा एका घरातील पिंजऱ्यात दिसतो आहे. जसं मालक गिटार वाजवतो तसं पोपट गायला सुरुवात करतो. जणू या पोपटानं गाणं शिकलंच असावं इतक्या सुंदरपणे तो गातो. त्याचं हे गाणं ऐकतच राहावं असं वाटतं. हे वाचा - OMG! महिलेनं चक्क हत्तीकडून करून घेतला मसाज; पाठीवर पाय ठेवला आणि… VIDEO VIRAL दरम्यान गिटारच्या तालावार पोपट गात असल्याचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीदेखील एक पोपट असाच गायला होता. Jatin Talukdar नावाच्या तरुणानं हा व्हिडीओ आपल्या फेसबुकला शेअर केला होता.
एक तरुण गिटार वाजवत खिडकीजवळ बसला होता. तेव्हा तिथं दोन पोपट येतात आणि त्यातील एक पोपट गिटारच्या धूनवर आपलं गाणं गाऊ लागतो. या व्हिडीओनंदेखील सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. हे वाचा - विशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO काही दिवसांपूर्वीच गायी-म्हशी असे प्राणी एखाद्या वाद्याचा आवाज ऐकून कसे धावत येतात याचेही बरेच व्हिडीओ व्हायरल झाले होते. आपल्या मालकासह गाण्यावर ताल धरणारी म्हैसही कदाचित तुम्ही पाहिली असावी. असे व्हिडीओ पाहून एक स्पष्ट होतं की, संगीत हे केवळ माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांनाही तेवढंच प्रिय असतं. प्राण्यांनाही संगीताची भाषा समजते.