जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Children's eye care: कमी वयात मुलांचे डोळे होऊ लागलेत खराब; त्रास वाढण्यापूर्वीच अशी घ्या काळजी

Children's eye care: कमी वयात मुलांचे डोळे होऊ लागलेत खराब; त्रास वाढण्यापूर्वीच अशी घ्या काळजी

Children's eye care: कमी वयात मुलांचे डोळे होऊ लागलेत खराब; त्रास वाढण्यापूर्वीच अशी घ्या काळजी

डोळे हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे अनेक वेळा डोळ्यांशी संबंधित त्रास सुरू होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 मे : कोरोनाच्या युगात ऑनलाइन क्लासेसपासून ते शाळेच्या गृहपाठापर्यंत मुलांचा बहुतांश वेळ स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर जातो. तर उर्वरित वेळ टीव्ही पाहण्यात आणि व्हिडिओ गेम खेळण्यात घालवतात. लॉकडाऊननंतर मुलांना अजूनही याची सवय आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या डोळ्यांची विशेष काळजी (Eyes care) घेणे अत्यंत गरजेचे (Parenting Tips) आहे. डोळे हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे अनेक वेळा डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही या सर्व समस्या टाळू शकता. अक्षरे मोठी करून वाचा - फोन किंवा कॉम्प्युटरवर शाळेचा गृहपाठ करताना मुले अनेकदा लहान अक्षरे स्क्रीनच्या जवळ जावून वाचत राहतात. त्यांना असे करण्यापासून थांबवा आणि अक्षरे मोठी करून किंवा झूम करून वाचायला सांगा. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होणार नाही. वेळ ठरवा - जर तुमचे मूल स्क्रीनवर बराच वेळ घालवत असेल तर ते डोळ्यांसाठी तसेच आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अशा परिस्थितीत मुलांसाठी स्क्रीन टाइमिंग निश्चित करा आणि त्यांना ठराविक वेळेनंतर स्क्रीन पाहण्यापासून रोखा. हे वाचा -  स्वयंपाकघरात मुंग्यांनी वैताग आणलाय? ही एक ट्रिक वापरून बघा कशा पळतात डोळ्यांची तपासणी - वेळोवेळी अधेमध्ये मुलांच्या डोळ्यांची तपासणी करायला विसरू नका. कारण अनेकदा मुले डोकं दुखत असल्याचं कारण सांगतात, पण कशामुळे दुखत असते याचा अंदाज येत नाही. कदाचित डोळ्यांमुळेदेखील हा त्रास होत असतो, त्यासाठी तपासणी केल्यानंतर त्या अडचण असेल तर समजते. पोषक तत्वांनी युक्त आहार - डोळे निरोगी ठेवण्यासाठी मुलांना जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारखे पोषक आहार देण्यास विसरू नका. यासाठी मुलांच्या आहारात दूध, दही, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. हे वाचा -  घरामध्ये घड्याळ लावताना या चुका करू नका; दिशा चुकली तर अनेक गोष्टी बिघडतात दिनचर्येमध्ये व्यायाम आवश्यक - मुले अनेकदा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत आळशीपणा दाखवू लागतात. अशा परिस्थितीत मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाला त्यांच्या दिनचर्येचा भाग बनवणे आवश्यक आहे. तसेच या काळात मुलांना डोळ्यांचे व्यायामही करायला सांगा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात