मुंबई, 23 सप्टेंबर : प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की, त्यांचे पाल्य त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थितपणे करेल. परंतु, त्यासाठी पालकांना त्यांच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट व्हावे लागेल आणि मग ते तुम्हाला त्यांचा आदर्श मानतील. यासाठी पालक झाल्यानंतर आपल्या वाईट सवयी कायमच्या सोडून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलं ही आई-वडिलांची सावली असतात, असं म्हणतात. अशा वेळी पालक एखाद्या गोष्टीवर चिडतात किंवा रागावतात तर या वाईट सवयींचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो आणि ते पालकांच्या या सवयीही शिकतात. येथे जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या स्वतःच्या सवयींमध्ये कोणते बदल केले पाहिजेत. जेणेकरून तुमचे मूल तुम्ही जे काही बोलता ते ऐकेल आणि त्याचे पालन करेल. पालकांनी या सवयींमध्ये बदल करावा - बाळ तुमचे अनुकरण करते - लक्षात ठेवा की, मुले लहान असल्यापासून त्यांच्या सभोवतालच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे निरीक्षण करतात आणि त्यांचे वर्तन पाहुन त्यानुसार अनुसरण करण्यास शिकू लागतात. मोठी मुले देखील अशीच असतात आणि त्यांच्या पालकांच्या सवयी शिकतात. अशा वेळी त्यांच्यासमोर कधीही चुकीच्या गोष्टी करू नका किंवा कोणाशीही गैरवर्तन करू नका. भांडू नका - अनेक पालक मुलांसमोर आपसात भांडायला लागतात, त्याचा मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही त्यांना भांडू नका म्हणून सांगाल तर तेही तुमचे ऐकणार नाहीत आणि वाद-भांडण-अपशब्द बोलायला शिकतील. मुलांकडे दुर्लक्ष करणे - मुलाला तुमच्यासोबत काही शेअर करायचे असेल तर अनेक वेळा बिझी लाइफमध्ये लोक त्याचे ऐकण्यास नकार देतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तुमच्या अशा वागण्यामुळे ते नंतर तुमच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करायला शिकतील. हेे वाचा - मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही छोट्या-छोट्या गोष्टींवरून बोलणे/रागावणे - जर एखाद्या मुलाने चूक केली तर त्याला वारंवार बोलण्याऐवजी किंवा शिव्या देण्याऐवजी तुम्ही त्याचे ऐकून घ्या आणि चूक त्याला योग्यप्रकारे समजून सांगा, तर तो नेहमीच तुम्ही सांगितलेले पालन करेल. त्यामुळे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावणे सोडून द्या. हे वाचा - तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय आपली जीवनशैली सुधारा - मुलांनी सकाळी योग्य वेळी जागे व्हावे आणि तयार व्हावे, असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम तुमची जीवनशैली सुधारा, तुम्ही योग्य वेळेनुसार कामे करा म्हणजे ते आपोआप शिकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.