मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Home Remedies : तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies : तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

आनुवंशिक कारणानंही त्वचा तेलकट असू शकते. कारण काहीही असलं, तरी तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.

आनुवंशिक कारणानंही त्वचा तेलकट असू शकते. कारण काहीही असलं, तरी तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.

आनुवंशिक कारणानंही त्वचा तेलकट असू शकते. कारण काहीही असलं, तरी तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई,  21 सप्टेंबर :  त्वचेची काळजी घेताना त्वचेच्या प्रकारानुसार तिची देखभाल करावी लागते. त्वचा कोरडी आहे की तेलकट यावरून कोणती सौंदर्यप्रसाधनं वापरावी हे ठरवावं लागतं. तेलकट त्वचेवर मुरुमं, ब्लॅकहेड्स अधिक येतात. तसंच वारंवार धुऊनही त्वचा थोड्या वेळानंतर तेलकट दिसते. काही घरगुती उपाय त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. वातावरणातल्या बदलाचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. तेलकट त्वचेमागचं हे एक कारण असतं. त्याशिवाय आनुवंशिक कारणानंही त्वचा तेलकट असू शकते. कारण काहीही असलं, तरी तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेच्या खालच्या भागात असणाऱ्या सिबॅशियस ग्रंथींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सीबम तयार झालं, तर त्वचा तेलकट बनते. सीबम हा घटक त्वचेला मॉयश्चराइज ठेवण्याचं काम करत असतो; मात्र त्याचं प्रमाण गरजेपेक्षा वाढलं तर त्वचा तेलकट बनते. त्याकरिता काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.

    मध

    मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल व अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे तेलकट त्वचेवर येणाऱ्या मुरमांपासून सुटका होऊ शकते. त्याचं कारण मधामुळे त्वचेवरचा तेलकटपणा कमी होतो. तसंच नैसर्गिकरित्या त्वचा मॉयश्चराइजही होते.

    टोमॅटो फायदेशीर

    टोमॅटोसुद्धा त्वचेला तेलकट बनण्यापासून वाचवतो. टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड असतं. यामुळे त्वचेमधलं तेल कमी होतं. या सॅलिसिलिक अ‍ॅसिडमुळे मुरमं कमी होतात.

    हेही वाचा - Heart Attack ची लक्षणं वेळीच ओळखा; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गमवावा लागला जीव

    कोरफड

    कोरफड अनेक रोगांवर गुणकारी आहे. त्वचा व केसांसाठी तर कोरफडीइतकं प्रभावी औषध नाही. तेलकट त्वचेसाठी कोरफड वापरताना आंघोळीच्या एक तास आधी चेहऱ्याला कोरफडीचा गर अथवा जेल लावा. एका तासानं चेहरा स्वच्छ धुवा. ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील आहे, त्यांनी कोरफडीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करून पाहा.

    दिवसातून दोनदा चेहरा धुवा

    त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी चेहरा धुणं हा अगदी सोपा व सहज करता येण्यासारखा उपाय आहे; मात्र चेहरा धुताना खूप प्रमाणात साबण किंवा फेसवॉशचा वापर करणं टाळा. त्याऐवजी ग्लिसरीनयुक्त साबण किंवा फेसवॉश वापरा. दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा धुवा.

    तेलकट आहार टाळा

    आपला आहार जसा असतो, तसंच आपलं शरीर तयार होतं असं म्हणतात. त्यामुळेच तेलकट त्वचेची समस्या असणाऱ्यांनी तेलकट आहार टाळावा.

    योग्य प्रमाणात पाणी पिणं हे चांगल्या कांतीसाठी खूप गरजेचं असतं. पाण्यामुळे त्वचा मॉयश्चराइज्ड राहते व तेलकटपणाही कमी होतो. तेलकट त्वचा झाकण्याकरिता काही वेळा मेकअपची मदत घेतली जाते; मात्र त्यात वापरण्यात येणारी उत्पादनं तेलकट असतील, तर त्यांचा त्वचेवर दुष्परिणाम होतो व त्वचा अधिक तेलकट बनते. त्यामुळे अशी उत्पादनं वापरणं टाळावं. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle