मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘ड्रेसचा गळा थोडा 'डीप' शिवायचाय; पण...' पाकिस्तानी सोशल मीडियावर काय सुरू आहे ही Deep Neck ची चर्चा

‘ड्रेसचा गळा थोडा 'डीप' शिवायचाय; पण...' पाकिस्तानी सोशल मीडियावर काय सुरू आहे ही Deep Neck ची चर्चा

संस्कृतीरक्षक सगळ्याच समाजात असतात आणि स्त्रियांच्याच बाबतीत ते अतिकाळजी दाखवत असतात. पाकिस्तानातल्या एका तरुणीचा ब्लाउजच्या मोठ्या गळ्यासंदर्भातला ट्वीट सध्या जगभर चर्चेचा विषय कसा आणि का झालाय वाचा...

संस्कृतीरक्षक सगळ्याच समाजात असतात आणि स्त्रियांच्याच बाबतीत ते अतिकाळजी दाखवत असतात. पाकिस्तानातल्या एका तरुणीचा ब्लाउजच्या मोठ्या गळ्यासंदर्भातला ट्वीट सध्या जगभर चर्चेचा विषय कसा आणि का झालाय वाचा...

संस्कृतीरक्षक सगळ्याच समाजात असतात आणि स्त्रियांच्याच बाबतीत ते अतिकाळजी दाखवत असतात. पाकिस्तानातल्या एका तरुणीचा ब्लाउजच्या मोठ्या गळ्यासंदर्भातला ट्वीट सध्या जगभर चर्चेचा विषय कसा आणि का झालाय वाचा...

कराची, 3 जुलै: महिला आणि मुलींना सजायला, नटायला आवडतं. कुणाला साडी (saree) आवडते, तर कुणाला ड्रेसेस (dress), जीन्स, वनपीस. मात्र, प्रत्येकच महिला किंवा मुलगी तिच्या आवडीप्रमाणे कपडे घालते असं नाही. कपडे घालताना आपल्या घरातील वातावरण, बंधनं असतात. आपण ज्या शहरात, गावात, परिसरात राहतो त्याला अनुसरून कपडे घालावे लागतात. मुलींच्या कपड्यांवरून टीका करणारे आणि जज करणारे देखील कमी नाहीत. मुलींनी पूर्ण शरीर झाकेल असेच कपडे घालायला हवेत, फुल बाह्या असलेलेच कपडे घालायला हवेत, असे बरेच नियम आपण ऐकले असतील. आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं सांगायचं कारण काय? तर हे सगळं सांगण्यामागचं कारण एक ट्विट आहे. पाकिस्तानातल्या एका मुलीनं केलेलं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केलाय. या मुलीनी पाकिस्तानातील महिलांच्या कपड्यांबद्दल थेट वाच्यता केली आहे. संस्कृतीरक्षक त्यांना कसे उपदेश देतात हे मांडलं गेल्यावर अनेक महिलांनी आपल्या व्यथा ट्विटरवर व्यक्त केल्या. नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरील चर्चेत काही समर्थक काही विरोधक सामील झाले आणि तो बातमीचा विषय झाला. याबद्दल बीबीसीने सविस्तर वृत्त दिलंय.

एका युजरने खोल गळ्याचा ड्रेस घातलेला मुलीचा फोटो पोस्ट करून त्यावर विचारलंय की ‘मला ब्लाऊजचा खोल गळा शिवायचा आहे, मी माझ्या आईला यासाठी कसं मनवू.’ या युजरला हिना नावाच्या एका ट्विटर युजरने उत्तर दिलं, ‘मॉम छोडो हमारा तो दर्जी भी नही मानता.’ म्हणजे ‘आई तर सोडाच पण टेलर देखील आमचं ऐकत नाही.’ असं. म्हणजे जर या पाकिस्तानातल्या महिलांनी एखादी फॅशन शिवून द्यायला सांगितलं तर त्यांचे दर्जी म्हणजे टेलरच त्यांना उपदेश करतात आणि तसं कपडे शिवायला नकार देतात. खोल गळ्याचा किंवा स्लीव्हलेस ब्लाउज शिवून द्यायला तयार होत नाहीत असं या सगळ्याच महिलांचं म्हणणं आहे. मात्र, आता तिचं हे ट्विट पाकिस्तानमध्ये खूप व्हायरल झालं असून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाहुयात त्यातील काही निवडक प्रतिक्रिया.

प्रेग्नंट महिलांना कशी घेता येईल कोरोना लस? मोदी सरकारने दिले दोन मार्ग

एका युजरने हिनाला उत्तर देताना म्हटलंय की, ‘आपल्या इथे आईपेक्षा जास्त काळजी टेलरला आहे.’ तर दुसऱ्या एका युजने म्हटलंय की एकदा मी टेलरला गुडघ्यापर्यंत लांबी असलेला ड्रेस शिवायला सांगितला तर त्याने म्हटलं की एवढा छोटा ड्रेस चांगला दिसणार नाही. एक युजर म्हणाली, ‘आमचा टेलर स्लिव्हलेस तर नाहीच पण छोट्या बाह्या देखील शिवून देण्यास नाही म्हणतो.’ यावर एका युजरने म्हटलंय की असे सल्ले आपल्या इथे (पाकिस्तानात) फक्त पुरूष टेलर नाही तर महिला टेलरदेखील देतात.

इम्युनिटी वाढवण्यासाठी घेता व्हिटॅमिन्स; Overdoseने येईल नपुंसकत्व

या सर्व महिलांच्या प्रतिक्रिया होत्या. यावर काही पुरूषांनी देखील मतं व्यक्त केली आहेत. एक युजर म्हणाला, पुन्हा एखादा टेलर असं म्हटला तर त्याला सांगा हे जग स्वतंत्र आहे. तर दुसऱ्याने म्हटलं की ‘टेलरला सांगा टेलरच राहा, नवरा काय बनतोयस.’

कपड्यांवरून एखाद्याला ट्रोल करणं नवीन नाही. महत्वाचं म्हणजे सहसा पुरूषाना ट्रोल केलं जात नाही. पाकिस्तानातील महिलांना वाटत असेल त्यांनी फॅशनेबल कपडे घालावे मात्र, घालता येत नाहीत. पण याची चर्चा त्या इतर ठिकाणी करू देखील शकत नाहीत. पण या ट्विटने बऱ्याच युजर्सनी त्यांच्या मनातील बोलून दाखवलं एवढं मात्र नक्की.

First published:

Tags: Fashion, Pakistan, Pakistani, Women