advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / इम्युनिटी वाढवण्यासाठी घेता व्हिटॅमिन्स; Overdoseने येईल नपुंसकत्व

इम्युनिटी वाढवण्यासाठी घेता व्हिटॅमिन्स; Overdoseने येईल नपुंसकत्व

कोरोना काळात व्हिटॅमीन सी आणि झिंक (Vitamin C & Zinc) शरीराला आवश्यक म्हणून बहुतेक सगळ्या रुग्णांना आणि संशयित रुग्णांना दिलं जात आहे. पण याचं अतिरिक्त प्रमाण काही त्रासांनाही आमंत्रण देतं.

01
व्हिटॅमिन सी आणि झिंक रोगांना कारणीभूत असणा-या आजारांशी लढण्यास मदत करतं. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे हे दोन महत्त्वपूर्ण पोषक घटक आहेत.

02
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी आणि शरीरात ताकद निर्माण करण्यासाठी व्हिटामीन सी आणि झिंक मिळाणारे पदार्थ आहारात असायला हवेत.कोणत्याही गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने ते मिळवणं चांगलं आहे.

03
झिंक हे एक खनिज आहे. शरीरात थोड्याफार प्रमाणात का असेना झिंक असायला हवं. डीएनए तयार करणाऱ्या पेशींची वाढ,प्रोटीन तयार करणे,खराब झालेल्या पेशी बऱ्या करणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे यात झिंक महत्वाचं काम करतं.

04
लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील वाढ आणि गर्भधारणा यासारख्या वेगवान वाढीच्या काळात झिंकला विशेष महत्व आहे. अंड्या मधून झिंक मिळतं.

05
व्हिटॅमिन सी व्हायरल इन्फेक्शन आणि जखमा बऱ्या करण्यात महत्वाची भूमिका निभावतं. हे एक अँटीऑक्सिडेंट आहे. शरीरातील चयापचय प्रतिक्रियेत देखील ते महत्वाचं आहे आणि शरीरातील कोलेजेनसाठी ते महत्वाचं आहे.

06
व्हिटॅमिन सी,हा महत्वाचा घटक शरीरात असायला हवा. मात्र व्हिटॅमीन सी शरीरात इतर घटक द्रव्यांप्रमाणे साठवता येत नाही. त्यामुळे त्याचं दररोज सेवन करावं लागतं.

07
व्हिटॅमीन सी ला Ascorbic Acid देखील म्हटलं जातं हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. व्हिटॅमिन सी प्रथम पाण्यात विरघळतं आणि नंतर ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जातं. आपलं शरीर हे जीवनसत्व साठवत नसल्याने ते दररोज अन्नातून घेणं महत्वाचे आहे.

08
व्हिटॅमीन सी महत्वाचं असलं तरी त्याचं अतिरिक्त सेवन घातक असतं. एका दिवसात 2000 पेक्षा जास्त व्हिटॅमीन सी घेतल्यास त्याचा लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो.

09
शिवाय पचनक्रियेवर परिणाम होतो. जास्त प्रणात शरीरात गेल्यास अँटीऑक्सिडंटऐवजी प्रो-ऑक्सिडेंट म्हणून काम करतं. तर, किडनी स्टोनचाही धोका संभवतो.

10
दररोज 19 वर्षांवरील पुरुषांना 90 मिलीग्रॅम व्हिटामीन सीची गरज असते. तर, त्याचं वयात महिलांना 75 मिलीग्रॅम व्हिटामीन सी हवं असतं. गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळात महिलांना 85 ते 120 मिलीग्रॅम व्हिटामीन सी लागतं.

11
ज्यांना स्मोकींगची सवय आहे अशांनी अतिरिक्त प्रमाणात 35 मीलीग्रॅम व्हिटॅमीन सी घेण्याचा सल्लाही डाटेशियन देतात.

12
कोणत्याही मेडिसीन प्रमाणे व्हिटॅमीन सी घेण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांमधून व्हिटॅमीन सी घेणं चांगलं आहे. फळांच्या माध्यमातून व्हिटॅमीन सी घेण्याचा प्रयत्न करावा.

13
न शिजलेल्या पदार्थांच्या स्वरुपात घेणं उत्तम. शिजवणं किंवा गरम करण्याने व्हिटॅमीन सीयुक्त पदार्थांची पोषक मुल्य कमी होतात. त्यामुळे व्हिटामीन सीयुक्त फळ म्हणजे लिंबू, संत्र,आवळा यांचं सेवन करावं.

14
एका अभ्यासानूसार दिवसातून 1000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमीन सी घेण्याने शरीराची ते शोषण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते आणि अतिरिक्त व्हिटॅमिन सी मूत्रमाद्वारे शरीरातून बाहेर काढलं जातं.

  • FIRST PUBLISHED :
  • व्हिटॅमिन सी आणि झिंक रोगांना कारणीभूत असणा-या आजारांशी लढण्यास मदत करतं. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे हे दोन महत्त्वपूर्ण पोषक घटक आहेत.

    MORE
    GALLERIES