मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

संपूर्ण देशाला Remdesivir च्या संकटातून बाहेर काढू शकते; सोलापूरच्या अशा केमिकल कंपनीसमोरच अडचणी

संपूर्ण देशाला Remdesivir च्या संकटातून बाहेर काढू शकते; सोलापूरच्या अशा केमिकल कंपनीसमोरच अडचणी

संपूर्ण देशाला रेमडेसिवीर (Remdesivir) पुरवण्याचं बळ सोलापुरातील (Solapur) बालाजी अमाइन्स (Balaji Amines) कंपनीकडे आहे.

संपूर्ण देशाला रेमडेसिवीर (Remdesivir) पुरवण्याचं बळ सोलापुरातील (Solapur) बालाजी अमाइन्स (Balaji Amines) कंपनीकडे आहे.

संपूर्ण देशाला रेमडेसिवीर (Remdesivir) पुरवण्याचं बळ सोलापुरातील (Solapur) बालाजी अमाइन्स (Balaji Amines) कंपनीकडे आहे.

सोलापूर, 19 एप्रिल : कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढ्यात सध्या नवीन आव्हानं उभी ठाकली आहेत ती म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेलं रेमडेसिवीर (Remdesivir) औषध आणि ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा. दोघांची मागणी वाढली आहे. असं असताना आता ज्या रेमडेसिवीर औषधाची संपूर्ण देशाला गरज आहे, त्या रेमडेसिवीरचा पुरवठा हा ऑक्सिजनअभावी रखडलेला आहे. त्यामुळे हे दुहेरी संकट ओढावलेलं आहे. संपूर्ण देशाला रेमडेसिवीर पुरवण्याचं बळ एकट्या सोलापूरकडे आहे. कारण या औषधासाठी आवश्यक असलेला कच्चा माल सोलापूरच्या (Solapur) बालाजी अमाइन्समध्ये (Balaji Amines) तयार होतो. पण ऑक्सिजनअभावी या कंपनीसमोरच आता अडचणी आहेत.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा होऊ लागल्याने औद्योगिक संस्थांना ऑक्सिजन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि याचा परिणाम रेमडेसिवीरच्या उत्पादनावर होत आहे. रेमडेसिवीरसाठी आवश्यक असलेल्या घटकांची निर्मिती थांबली आहे.

हे वाचा - Corona vaccine update: 55 लाख रुपये खर्च करून दुबईत जाऊन घेतली जातेय लस

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी एकूण 27 घटकांची आवश्यकता असते.  त्यापैकी आवश्यक असलेले प्रमुख तीन घटक ट्रायइथाईल अमाईन, (triethylamine), डायमिथाईल फार्मामाईड (diethylamine) आणि एसिटोनायट्रायल (acetonitrile)  हे भारतात बालाजी अमाईन्समध्येच उत्पादित केले जातात. यासाठी मिथेनॉल अमोनिया, इथेनॉल अमोनिया, ॲसिटीक ॲसिड आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. पण आता औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनवर बंदी असल्याने या घटकांची निर्मिती होऊ शकत नाही. परिणामी रेमडेसिवीरचं उत्पादन होऊ शकत नाही.

बालाजी अमाइन्सचे सहव्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी सांगितलं, "रेमडेसिवीरसाठी लागणारा काही कच्चा माल हा महाराष्ट्रातूनच मागवला जातो. विशेष म्हणजे रेमडेसिवीरसाठी लागणारा डायमिथाईल फार्मामाईड हे अमाइन्स संपूर्ण देशात केवळ सोलापुरात तयार होतं. त्यामुळे रेमेडेसिवीर तयार करणाऱ्या सर्व कंपन्याना बालाजी अमाईन्स हा कच्चा माल पुरवत आहे"

हे वाचा - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय? शहरातील दिलासादायक आकडेवारी समोर

"या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत मदत मागितली आहे. प्रशासनामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्याहून ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जर तसं नाही झालं तर रेमडेसिवीरसाठी आवश्यक असलेले हे घटक परदेशातून आयात करावे लागतील", असं राम रेड्डी म्हणाले.

First published:

Tags: Coronavirus, Solapur