मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona vaccine update: 55 लाख रुपये खर्च करून दुबईत जाऊन घेतली जातेय लस

Corona vaccine update: 55 लाख रुपये खर्च करून दुबईत जाऊन घेतली जातेय लस

अनेक बड्या व्यक्ती दुबईत जाऊन लस घेत असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक बड्या व्यक्ती दुबईत जाऊन लस घेत असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक बड्या व्यक्ती दुबईत जाऊन लस घेत असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 19 एप्रिल : भारतातील श्रीमंत व्यक्ती कोरोनाची लस घेण्यासाठी (Corona vaccine) चार्टर्ड फ्लाइट्समधून दुबईला जात आहेत आणि यासाठी तब्बल 55 लाखांचा खर्च येत असल्याचं सांगितलं जात आहे. लोक तेथे फायजरच्या लशीला महत्त्व देत आहेत. तर यूएईमध्ये एस्ट्राजेनेका आणि साइनोफार्मची लसदेखील उपलब्ध आहे. यूएईमध्ये 40 वर्षीय आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मोफत कोरोनाची लस दिली जात आहे.

दुबईचा रेसिडेंट व्हिजा असणारे बड्या व्यक्ती कोरोना लस घेण्यासाठी दुबईला जात आहेत. हा ट्रेंड मार्चपासून सुरू झाला, जेव्हा दुबईच्या रेसिडेंट व्हिसाधारकांना लशीच्या नोंदणीची परवानगी दिल्यानंतर या संख्येत वाढ झाली. त्यात सध्या भारतात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या महिन्यात दुबईला लस घेण्यासाठी जाणाऱ्या बड्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं आहे. दुबईत लस घेतलेले आणि चार्ट ऑपरेटर्संचं म्हणणं आहे की, काही लोक लशीच्या दोन्ही मात्रा घेण्यासाठी दुबईमध्ये राहत आहेत. फायजरच्या दोन डोजमध्ये चीन आठवड्यांचं अंतर आहे. याबाबत काही लोकांना नाव न सांगण्याच्या अटीकाही माहिती दिली.

हे ही वाचा-LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली;'या' Apps च्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर

55 लाखांपर्यंत खर्च

लस लावण्यासाठी दुबई येण्या-जाण्याचा खर्च 35 लाख रुपयांपासून 55 लाखांपर्यंत होत आहे. हा खर्च याहून अधिकही होऊ शकतो. हे ऑपरेटरची किंमत, सिटी ऑफ ओरिजिन, दुबईमध्ये राहण्याचा काळ आणि नंबर ऑफ पॅसेंजर्सवर अवलंबून आहे. ज्या भारतीयांचा व्यवसाय दुबईत रजिस्टर आहे, त्यांच्या जवळ रेसिडेंट व्हिसा आहे. यूएई काही प्रोफेशनल कॅटेगरीमध्येदेखील रेसिडेंट व्हिसा उपलब्ध करते.

दुबईचा रेसिंडेंट व्हिसा बाळगणाऱ्या एका टॉप कॉर्पोरेट मॅनेजरने मार्चमध्ये दुबईमध्ये फायजरची लस घेतली होती. ते भारतातदेखील लस घेऊ शकत होते, मात्र ते म्हणाले की, मला वाटलं की, फायजर लस चांगली व सुरक्षित. मी आणि माझ्या पत्नीने एक प्रायव्हेट जेट घेतलं आणि आम्बी 20 दिवस दुबईत राहिले. सर्व व्यवस्थित झालं.

First published:

Tags: Corona patient, Corona updates, Corona vaccine, Dubai