Home /News /lifestyle /

ऑस्कर मिळवणारे कलाकार इतरांपेक्षा जास्त जगतात, काय आहे दीर्घायुष्याचं रहस्य?

ऑस्कर मिळवणारे कलाकार इतरांपेक्षा जास्त जगतात, काय आहे दीर्घायुष्याचं रहस्य?

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये, असं म्हणतात. पण ऑस्कर पुरस्कार प्राप्त कलाकारांना या दोन्ही देणग्या मिळतात. काय आहे त्यांचं दीर्घायुषी ठरण्याचं रहस्य? एका अभ्यासात समोर आल्यात ठळक गोष्टी...

दिल्ली, 28 एप्रिल: बहुतेकांना आपण दीर्घायुषी (live longer) व्हावं असं वाटतं. आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं असंही अनेकांना वाटतं. आपल्याकडे दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. तुम्हाला वाटेल हे आम्ही काय बोलत आहोत. पण विषय तसाच आहे एखादा पुरस्कार (Oscar Awardees) आणि दीर्घायुष्य (secret of long life) यांचा एकामेकांशी काही संबंध आहे, असा दावा जर कोणी केला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. तुम्ही म्हणाल, यात काय संबंध असणार? आपल्याला अर्थाअर्थी काहीही संबंध दिसत नसला तरी शास्त्रज्ञांनी तो शोधून काढला आहे. अभिनय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी दिलं जाणारं ऑस्कर अ‍ॅवॉर्ड (Oscar Awards) मिळवणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभू शकतं, असा दावा कॅनडातल्या (Canada) शास्त्रज्ञांनी केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे, त्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणता अभ्यास केला, याविषयी माहिती देणारं वृत्त टीव्ही 9 हिंदीनं प्रसिद्ध केलं आहे. टोरंटो युनिव्हर्सिटीतील (University of Toronto) शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं आहे. ऑस्कर विजेत्या व्यक्ती आणि दीर्घायुष्य यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी 1929 ते 2020 दरम्यान ऑस्करसाठी नॉमिनेट करण्यात आलेले 2,111 अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जीवनाचं विश्लेषण केलं. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे कलाकार सरासरी 81.3 वर्षांपर्यंत जगतात. तर ऑस्कर (Oscar Award) न मिळवू शकणारे कलाकार 76.4 वर्षे जगतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

चलन म्हणून वापरला जायचा कांदा, या देशात पूजेतही ठेवायचे! रडवणाऱ्या कांद्याबद्दल 8 गंमतशीर गोष्टी

संपूर्ण रिसर्चमध्ये 2,111 कलाकारांच्या जीवनाचा अभ्यास करण्यात आला होता. 1 जुलै 2020 सालापर्यंत त्यातील 1,122 कलाकारांचा मृत्यू झाला आहे. ऑस्कर मिळालेल्या कलाकारांचं सरासरी वय 77.1 वर्ष होतं. पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालेल्या कलाकारांचं सरासरी वय 73.7 वर्ष होतं. तर नॉमिनेशनही न मिळू शकणाऱ्या कलाकारांचं सरासरी वय 73.6 होतं.
या सर्व रिसर्चमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या कलाकारांचं वय सरासरी 81.3 असण्याचा दावा का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या काळात दीर्घायुष्य जगणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजेच लाइफ एक्सपेक्टन्सीमध्ये वाढ झाली आहे. या आधारावर जेव्हा कॅलक्युलेशन करण्यात आलं, तेव्हा पुरस्कार मिळवणाऱ्यांचं सरासरी वय 81.3 इतकं समोर आलं. भात खाऊन सुद्धा राहू शकते मधुमेह नियंत्रणात, संशोधनातून 'ही' माहिती आली समोर
 ज्या कलाकारांना ऑस्कर मिळाला आहे, त्यांचं यश आणि दीर्घायुष्याशी संबंध असतो, असं शास्त्रज्ञांना रिसर्चमधून दिसून आलं आहे. ऑस्कर मिळवणाऱ्या कलाकारांच्या दीर्घायुष्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. परंतु, असे कलाकार इतर कलाकारांच्या तुलनेत 4 ते 5 वर्षे अधिक जगतात, हे शास्त्रज्ञांनी आपल्या रिचर्सच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं आहे.
एका थेअरीनुसार, ऑस्कर मिळवणाऱ्या कलाकारांवर सोशल स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी आपोआपच दबाव वाढतो. त्यामुळे ते वेळेवर जेवतात, व्यायाम करतात, पूर्ण झोप घेतात आणि ड्रग्जपासून चार हात दूर राहतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ते एक आदर्श आयुष्य जगतात. ते जास्त ताण घेत नाहीत आणि रागावर नियंत्रण ठेवतात. हेच आहे ऑस्कर मिळवणाऱ्या कलाकारांच्या दीर्घायुष्याचं गमक. डेली मेलमधील रिपोर्टमध्ये ऑस्कर विजेते कलाकार आणि दीर्घायुष्य यात काहीतरी संबंध असल्याचं म्हटलं आहे. त्याबद्दल विविध थेअरी मांडल्या गेल्या आहेत पण त्यातून एकच गोष्ट समोर आली आहे की ऑस्कर विजेत्या कलाकाराचा दीर्घायुष्याशी संबंध आहे. तुम्हीही आरोग्याची काळजी घेतलीत तर तुम्हालाही दीर्घायुष्य लाभू शकतं.
First published:

Tags: Lifestyle, Oscar, Oscar award

पुढील बातम्या