दिल्ली, 27 एप्रिल: बहुतेक भाज्यांमध्ये, रेसिपीजमध्ये कांद्याचा (Onions) वापर केला जातो. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमध्ये कांदा हा आहारातला अविभाज्य भाग असतो. भाजीतील (Dish) मसाले (Spices) आणि इतर घटकांसह योग्य प्रमाणात कांदा वापरला तर तिला चव आणि सुगंध मिळतो. कांद्याशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी (Interesting Facts about onion) आहेत. या लेखामध्ये या मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया. 1) चलन (Currency) म्हणून वापर कांद्याचे दर वाढले की आपण गमतीनं म्हणतो, कांद्याला सोन्याचा भाव आला आहे. मध्ययुगीन काळात (Medieval Ages) खरोखरचं अशी परिस्थिती होती. त्यावेळी, वस्तू आणि सेवांचा मोबदला म्हणून तसंच भाडं देण्यासाठी चलन (Currency) म्हणून कांद्याचा वापर केला जात असे. 2) रोगांशी सामना करण्यात प्रभावी कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात क्युअर्सेटिन (Quercetin) हा घटक आढळतो. 2016 मध्ये यूएस सरकारनं प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, क्युअर्सेटिन फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवतं.
हे वाचा - सकाळी दात न घासता पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक?
इतकंच नाही तर कांद्यामध्ये मोतीबिंदूवर (Cataracts) उपचार करण्याचीही क्षमता आहे. 3) कुत्र्यांसाठी घातक ज्यांच्याकडे कुत्री (Dogs) पाळलेली आहेत त्यांना कदाचित ही गोष्ट माहिती असेल की, कुत्र्यांसाठी कांदा घातक असतो. कांद्यामुळे कुत्र्याच्या शरीरातील लाल रक्तपेशींवर (Red Blood Cells) परिणाम होऊ शकतो. कुत्र्यांच्या पोटात कांदा गेल्यास त्यांना उलट्या होऊन किंवा भूक न लागून अशक्तपणा जाणवू शकतो. इतर बऱ्याच बाबतीतही कांदा कुत्र्यांसाठी घातक ठरू शकतो. 4) जगातील सर्वांत मोठा कांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार(Guinness Book of World Records), यूकेतील हॅरोगेट येथील टोनी ग्लोव्हर (Tony Glover) यांनी जगातला सर्वांत मोठा कांदा (Biggest Onion) पिकवला आहे. ग्लोव्हर यांनी 2014 मध्ये, 8.5 किलो (18lb 11.84 oz) वजनाचा एक महाकाय कांदा पिकवला होता. हा जागतिक विक्रम आहे. 5) कांदे शक्ती वाढवतात प्राचीन ग्रीक लोकांच्या (Ancient Greeks) म्हणण्यानुसार, कांदे शरीराला शक्ती देतात. म्हणूनच त्याकाळी युद्धापूर्वी आणि युद्धांदरम्यान सैन्याला कांदे खायला देत असत.
हे वाचा - OMG! ‘सुपर से भी ऊपर’ आजीबाई; वयाच्या 99 व्या वर्षी इंजिनशिवाय उडवलं Plane; पाहा जबरदस्त Video
कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात आणि ते आपली प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करतात, या तथ्यावर ग्रीक लोकांचा समज अवलंबून होता.
- प्राचीन मूळ अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या (Archaeologists) मते कांद्याची उत्पत्ती इसवीसन पूर्व 5000 मध्ये झाली होती. कांस्ययुगातील (Bronze Age) वसाहतींमध्येही कांद्याचे अवशेष सापडले आहेत. 7) इजिप्शियन लोक कांद्याची पूजा करायचे प्राचीन इजिप्शियन (Egyptians) लोक कांद्याची पूजा करत असत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्यातील रिंग्ज आपल्या जीवनाचं वर्तुळ सूचित करतात. त्यांचा असाही विश्वास होता की, कांद्यामध्ये जादुई शक्ती (Magical Powers) आहेत आणि या शक्ती मृत्यूनंतरच्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणूनच अनेक राजांच्या मृत शरीरांसोबत खरेखुरे, मातीचे किंवा लाकडापासून तयार केलेले कांदे सारकोफॅगसमध्ये (Sarcophagus) ठेवलेले आढळले आहेत. 8) जुन्या मराठीत कृष्णावळ का म्हणत? कांद्याला काही मागच्या पिढीचे लोक कृष्णावळ असं गमतीने म्हणायचे. याचं कारण इंटरेस्टिंग आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो. आपल्या दैनंदिन परिचयाच्या असलेल्या कांद्याबाबत या मनोरंजक गोष्टी सांगितल्या जातात. आणखीही काही असतील तर जरूर कळवा.