Home /News /viral /

'तू काळजी करू नको, आम्ही...'; आई रुग्णालयात कोरोनाशी लढतेय, मुलांनी लिहिलं डोळ्यात पाणी आणणारं पत्र

'तू काळजी करू नको, आम्ही...'; आई रुग्णालयात कोरोनाशी लढतेय, मुलांनी लिहिलं डोळ्यात पाणी आणणारं पत्र

कोरोनाच्या संकटात अनेक मुलांनी आपल्या वृद्ध पालकांना आधार देण्यास नकार दिला. त्यामुळे हे पत्र खरंच खूप खास आहे.

    सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी सामना करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशभरातून दिवसभरात लाखो रुग्ण समोर येत आहेत. परिस्थिती खूप बदलली आहे. कोरोना संकटाबाबत सोशल मीडियावर अनेक घटना समोर येत आहेत. काही प्रकरणं पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. जे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एका महिलेला जेव्हा कोरोनाची लागण झाली, तेव्हा मुलांनी आईसाठी एक पत्र लिहिलं. जे पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुसऱ्या लाटेत घराघरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच या महासाथीचा फटका बसला आहे. यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेच्या मुलांनी तिच्यासाठी एक पत्र लिहिलं. जे वाचल्यानंतर लोक खूप भावुक झाले. मुलांनी लिहिलं की, आई आम्ही खालीच आहोत. तुमची तब्येत सुधारत आहे. आम्ही तुला लवकरच घेऊन जाऊ. चिंता करू नको. पत्राच्या खाली मुलांची नावं लिहिण्यात आली आहे. या पत्राच्या माध्यमातून मुलांनी आईपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या आहेत. अनेक प्रकरणात तर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातेवाईकांनी तोंड फिरवलं आहे. आपल्या वृद्ध नातेवाईकांना आधार देण्यास कित्येक मुलांनी नकार दिला आहे. त्यामुळे हे पत्र खरंच खूप खास आहे. हे ही वाचा-कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा नाही ना? सोशल मीडियावर पत्र व्हायरल सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी हे पत्र शेअर केला आहे. त्यात लिहिलं आहे की, सर्वात सुंदर पत्र...हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 43 हजार लोकांनी हे पत्र पसंत केलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Corona patient, Mother

    पुढील बातम्या