Home /News /lifestyle /

हे आहे देशातलं सगळ्यात आनंदी शहर; इथे घर घेणं असेल सुखकारक

हे आहे देशातलं सगळ्यात आनंदी शहर; इथे घर घेणं असेल सुखकारक

घर घेण्याच्या दृष्टीने सर्वात आनंदी शहर कुठलं याच्या यादीत मुंबई कुठल्या स्थानावर आहे पाहा...

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: घर (Home) ही प्रत्येकासाठी जिव्हाळ्याची गोष्ट असते. आपण ज्या ठिकाणी काम करतो, राहतो तिथं किंवा आपल्या मूळ गावी आपलं हक्काचं घर असण्याला अनेकांचे प्राधान्य असते. आजकाल मोठ्या शहरांमध्ये घर घेणं अतिशय कठीण आहे. घरांच्या प्रचंड किमती, महागाई, गर्दी, प्रदूषण, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यानं छोट्या शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आपलं घर ज्या भागात, शहरात असेल ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. अनेकजण घर घेण्यासाठी अशा ठिकाणाची निवड करतात जिथं शांतता, निसर्गसौंदर्य असेल. प्रत्येक शहराची एक संस्कृती असते. ती आवडली तर तिथं राहणं सुखाचे, आनंदाचे होते. जगभरात दरवर्षी आनंदी शहरांची निवड केली जाते. अशा आनंदी शहरांच्या (Happiest Cities) यादीत यंदा देशातील चंडीगड (Chandigarh) या शहराने स्थान पटकावले आहे. ब्रिटनमधील (UK) ऑनलाइन मॉर्गेज ॲडव्हायझर (Online Mortgage Adviser) कंपनीनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट 2021मध्ये जगभरातील हजारो जिओ टॅगिंग इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे हा हॅपीनेस स्कोअर (Happiness Score) काढण्यात आला. याकरता पोस्टसमध्ये टॅग करण्यात आलेल्या चेहऱ्यांवरून सामान्य इन्स्टाग्राम युझरपेक्षा अलीकडेच घर घेणाऱ्या लोकांचा आनंद किती आहे. याची नोंद करण्यात आली. यासाठी दोन सेट बनवण्यात आले होते. एक होता हॅशटॅग सेल्फीसह पोस्ट करण्यात आलेल्या लोकांचा ग्रुप आणि एक न्यू होम ओनर या हॅशटॅगसह पोस्ट करणाऱ्या लोकांचा. या पोस्ट्समध्ये टॅग असलेल्या चेहऱ्यांचे स्कॅन करून हा स्कोअर काढण्यात आला. तुम्हाला माहीत आहे का? जास्त ताण-तणावामुळंही पोटावरील चरबी वाढते, असा करा उपाय या अभ्यासात घर खरेदी करण्यासाठी जगभरातील 20 आनंदी शहरांची (World's 20 Happiest Cities) निवड करण्यात आली असून, त्यात भारतातील (India) 5 शहरांचा समावेश आहे. या यादीत पाचव्या स्थानावर चंडीगड (Chandigarh) आहे, त्यानंतर दहाव्या स्थानावर जयपूर (Jaipur), 13 व्या स्थानावर चेन्नई (Chennai) , 17 व्या स्थानावर इंदूर (Indur)आणि 20 व्या स्थानावर लखनौ (Lukhnow) आहे. भारतातील पाच शहरांमध्ये चंडीगड अव्वल स्थानावर आहे. चंडीगडचा हॅपीनेस स्कोअर सर्वोधिक आहे. म्हणजेच इथं घर घेणं, वास्तव्य करणं अत्यंत आनंददायी आहे. जगातील सर्वांत आनंदी शहर स्पेनमधील (Spain) बार्सिलोना (Barsilona) आहे, या शहराचा सरासरी हॅपीनेस स्कोअर 100 पैकी 95.4 इतका आहे. गृह खरेदीदारांच्या जागतिक हॅपीनेस स्कोअरपेक्षा तो 15.6 टक्के अधिक आहे. त्यानंतर इटलीमधील फ्लोरेंस (Florence) दुसऱ्या क्रमांकावर तर दक्षिण कोरियातील (South Korea) उल्सान (Ulsan) शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टीचं वाटतंय भय; असू शकतो Phobia, एक भीतीचा आजार सगळ्यात कमी आनंदी (Lowest Happy City) असणारे शहर मुंबई (Mumbai) ठरले असून त्याचा हॅपीनेस स्कोअर 100 पैकी 68.4 आहे. गृह खरेदीदारांच्या जागतिक हॅपीनेस स्कोअरपेक्षा याचा स्कोअर 17.1 टक्के कमी आहे. त्यानंतर अमेरिकेतील (USA) अटलांटा (Atalanta) आणि ऑस्ट्रेलियातील (Australia)सिडनी (Sydney)ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतातील सुरत (Surat) शहराने सगळ्यात कमी आनंदी शहरांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. घर घेण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वांत आनंदी शहरात घर घेण्याचा नक्की विचार करा. इथे राहणे सर्वांगीणदृष्ट्या लाभदायी असेल.
    First published:

    Tags: Chandigarh, Mumbai

    पुढील बातम्या