Home /News /news /

तुम्हाला माहीत आहे का? जास्त ताण-तणावामुळंही पोटावरील चरबी वाढते, असा करा उपाय

तुम्हाला माहीत आहे का? जास्त ताण-तणावामुळंही पोटावरील चरबी वाढते, असा करा उपाय

कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तणाव हा ओटीपोटाच्या लठ्ठपणाचे कारण असू शकतो? तणावामुळे शरीरातील कोर्टिसोल (Cortisol) हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे पोटावरील चरबी वाढू (Stress increase tummy fat) शकते.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : तणाव (Stress) केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर यामुळे शारीरिक नुकसान देखील होऊ शकते. तणावात असताना कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, सर्वत्र नाराजीचे वातावरण तयार होते. पण, कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तणाव हा ओटीपोटाच्या लठ्ठपणाचे कारण असू शकतो? तणावामुळे शरीरातील कोर्टिसोल (Cortisol) हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे पोटावरील चरबी वाढू (Stress increase tummy fat) शकते. कोणतेही काम असो, ते करताना जर तणाव असेल तर तुम्ही ते व्यवस्थित करू शकत नाही. म्हणूनच आपले शरीर निरोगी ठेवणं आणि आपले मानसिक आरोग्य देखील निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण लठ्ठपणा आणि तणाव या दोन्हींपासून दूर राहू शकू. कोर्टिसोल म्हणजे काय कोर्टिसोल एक स्टेरॉईड संप्रेरक आहे, जे आपण तणावात असताना शरीरात स्त्रवले जाते. यामुळे ग्लुकोकोर्टिकोइड हार्मोन रक्तातील साखरेची पातळी वाढवते. अत्यंत तणावपूर्ण आणि गंभीर परिस्थितीचा सामना केल्यानंतर शरीरात कोर्टिसोल तयार होऊ लागते. वजनाशी कोर्टिसोलचा संबंध? जरी आपण चरबी आणि साखर असलेले पदार्थ खात नसलो तरीही, कोर्टिसोल आपले चयापचय कमी करते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. हे वाचा - WOW With Sonali मध्ये ललित प्रभाकरचे खरे बोल ; म्हणतो, मला सई ताम्हणकरसोबत डेटला जायला आवडेल तणावाच्या दरम्यान कोर्टिसोल सोडला जातो. यामध्ये वजन वाढते, कारण एखाद्याला जास्त मिठाई खावीशी वाटते आणि नंतर ह्यामुळे वजन वाढते. तणावाच्या वेळी, बरेच लोक कर्बोदकांचे जास्त प्रमाणात सेवन करतात ज्यामुळे कोर्टिसोल वाढतो. मग यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो. तणावामुळे भूक वाढते आणि पुन्हा - पुन्हा अन्न खाण्याची इच्छा असते, विशेषतः गोड किंवा फॅटी गोष्टी. हे वाचा - OLX वरुन जुनी गाडी बुक केली, पण गळ्यात पडली तरुणी; सत्य समजताच पोलिसानं कोर्टात घेतली धाव असे करा संरक्षण तणाव टाळण्यासाठी भाज्या आणि अख्खी धान्य खावी. याशिवाय सॅल्मन फिश, उकडलेले अंडे, चेरी, सूर्यफूल बिया, रताळी, निळे बेरी, आले इत्यादीही ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mental health, Stress

    पुढील बातम्या