मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लग्नाच्या दिवशीच locha झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा

लग्नाच्या दिवशीच locha झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा

लग्नात असा ट्विस्ट आला की सर्वांनाच धक्का बसला.

लग्नात असा ट्विस्ट आला की सर्वांनाच धक्का बसला.

लग्नात असा ट्विस्ट आला की सर्वांनाच धक्का बसला.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 06 एप्रिल: दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवली. अखेर तो दिवस आलाच. त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होणार होती. दोघांच्या नात्याला नवं नाव मिळणार होतं, पती-पत्नीचं. दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार होते. ही आपली बायको आणि हा आपला नवरा होणार या विचारानेच त्यांच्या मनात गुदगुदल्या होत होत्या. इतक्यात लग्नात नवा ट्विस्ट आला. जिच्याशी तो लग्न करायला निघाला, जिला तो आपली बायको बनवणार होता, ती चक्क त्याची बहीण निघाली (grooms know that his bride is sister).

चीनमधील एका लग्नातील ही विचित्र गोष्ट आहे. लग्न लागत होतं. इतक्या वराच्या आईला वधूच्या हातावर एक निशाण दिसलं. हे निशाण म्हणजे तिची जन्मखूण होती. निशाण पाहून वराच्या आईला रडू कोसळलं. कारण ती वधू दुसरी तिसरी कुणी नाही तर तिच्या पोटची मुलगी होती. होणारी सूनच आपली मुलगी निघाली.

हे वाचा - केस कापताना लहान मुलांसारखा ढसाढसा रडू लागला; तरुणाचा सलूनमधील मजेशीर VIDEO पाहा

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार त्या मुलीच्या आईबाबांबाबत विचारण्यात आलं, तेव्हा ज्यांच्याकडे ती लहानाची मोठी झाली त्यांना ती 20 वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यांनी तिला दत्तक घेतलं होतं. ही मुलगी लहान असताना हरवली होती. तिच्या खऱ्या आईने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही. अखेर इतक्या वर्षाने मायलेकीची भेट झाली आणि दोघीही मिठी मारून रडू लागल्या.

आता नवरोबाचं काय? जी बायको होणार ती तर बहीण निघाली. मग आता संपलं सर्व. तुम्हालाही असंच वाटलं असेल. पण नाही. सर्वात मोठा ट्वीस्ट तर पुढे आहे. कारण भले त्यांच्यातील नातं बहीण-भावाचं असल्याचं समजलं तरी त्यांचं लग्न थांबवलं नाही. कारण तो नवरासुद्धा त्याच्या आईचा खरा मुलगा नव्हता. मुलगी हरवल्यानंतर तिने या मुलालाही दत्तक घेतलं होतं.

हे वाचा - पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

याचा अर्थ या दोघांमधील नातं हे रक्ताच्या बहीण-भावाचं नव्हतं. शिवाय वधू आणि वर दोघांच्याही कुटुंबाला या लग्नाची काहीच अडचण नव्हती. त्यामुळे ते शेवटी पती-पत्नी झालेत. सत्य समोर आल्यानंतरही त्यांचं लग्न जसं ठरलं अगदी तसंच पार पडलं.

First published:

Tags: China, Marriage, Relationship, Viral, Viral news, Wedding