मुंबई, 06 एप्रिल : सलूनमध्ये (Saloon) गेल्यावर केस कापताना लहान मुलं रडतात हे सर्वांना माहिती आहे. पण चक्क एखादी प्रौढ व्यक्ती रडली असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social media) अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो एखाद्या लहान मुलांसारखाच ढसाढसा रडतो (Man crying listening Emotional Song In Saloon) आहे.
सलूनमध्ये असं नेमकं घडलं तरी काय की हा तरुण इतका रडायला लागला. ते तुम्ही या व्हिडीओतच पाहा. त्या व्यक्तीला रडताना पाहून तुम्हाला मात्र तुमचं हसू आवरणार नाही.
ही व्यक्ती केस कापत असताना केस कापले जात आहेत म्हणून नाही किंवा काही लागलं म्हणून नाही तर चक्क गाणं ऐकून रडते आहे. बहुतेक सलूनमध्ये टाइमपाससाठी गाणी लावली जातात. असंच गाणं या सलूनमध्येही लावलं होतं. पण ही व्यक्ती जेव्हा केस कापायला बसली तेव्हा इमोशनल गाणं लागलं आणि त्यानंतर मात्र ही व्यक्तील स्वतःला आवरू शकली नाही. तिला रडूच कोसळलं.
हे वाचा - पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही
व्हिडीओत पाहू शकता हा तरुण कसा ढसाढसा रडतो आहे. तो रडायला लागताच केस कापणारासुद्धा थोडा वेळ थांबतो. त्यानंतर ही व्यक्ती टेबलवर डोकं ठेवून रडते. सलूनमधील टॉवेल घेऊन डोळे पुसते. रडू आवरण्याचाही प्रयत्न करते. पण रडू काही थांबत नाही. तो रडत असताना सलूनमधील मात्र सर्वजण हसताना दिसत आहेत.
हे वाचा - आधी जमिनीवर आपटलं नंतर...; 82 वर्षीय आजोबांनी चोराला कशी घडवली अद्दल पाहा VIDEO
खरंतर हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरलं नसेल. सोशल मीडियावरसुद्धा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Emotional, Funny video, Social media viral, Song, Viral, Viral videos