मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही; मजेशीर VIDEO VIRAL

पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही; मजेशीर VIDEO VIRAL

पक्ष्य़ांना खाणं देण्यासाठी अशी पोझ देऊन उभा राहिला वरून पक्षी आला आणि...

पक्ष्य़ांना खाणं देण्यासाठी अशी पोझ देऊन उभा राहिला वरून पक्षी आला आणि...

पक्ष्य़ांना खाणं देण्यासाठी अशी पोझ देऊन उभा राहिला वरून पक्षी आला आणि...

मुंबई, 06  एप्रिल: पक्ष्यांना खायलं (Feeding birds) घालणं तसं चुकीचं नाही. पण त्यांना आपण नेमकं काय खायला देत आहोत आणि ते कशा पद्धतीने हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पक्ष्यांना खायला देताना काहीही खायला देणं आणि विचित्र पद्धतीने खायला देणं आपल्यावरच कसं उलटू शकतं, याचाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारल (Social media viral video) होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण सीगलला चिप्स खायला देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो विचित्र पद्धत वापरतो. त्याला खरंतर सीगल्सना खायला देताना आपला व्हिडीओ तयार करायचा आहे. त्याच्यासमोरील व्यक्तीला तो आपलं शूट करायला सांगतो. आता आपल्याकडे सर्वांचं लक्ष जावं, यासाठी तो एक हटके पद्धतीचा वापर करतो.

एकतर तो पक्ष्यांना चिप्स खायला देत असतो. तेसुद्धा तो हातात धरत नाही तर चक्क आपल्या तोंडात धरतो. पायात थोडा वाकून तोंडात चिप्स धरून तो वरच्या दिशेने पाहतो. जेणेकरून सीगल्स त्याच्या तोंडातील चिप्स आपल्या चोचीत उचलून नेतील. असंच त्याला वाटतं. यासाठी तो खूप उत्साहीपण दिसतो.

हे वाचा - लुटूलुटू चालणाऱ्या पेंग्विनला कधी उडताना पाहिलंय का? पाहा हा दुर्मिळ VIDEO

पण त्याने जो काही विचार केलेला असतो, नेमकं त्याच्या उलटंच घडतं. एकही सीगल्स त्याच्याजवळ येत नाही. त्याच्या तोंडातील चिप्स उचलत नाही. पक्ष्यांनासुद्धा आपल्यासाठी काय खाणं चांगलं आहे आणि काय नाही, हे समजतं. असाच जणू हा व्हिडीओ. इतकंच नव्हे तर उलट सीगलच त्याला खायला देतात.

हे वाचा - VIDEO - आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भुकेला कुत्रा मालकासमोर गेला आणि...

व्यक्ती तोंड वर करून उभा होताच एक सीगल उडता उडता त्याच्यावर शी करतो. सीगलची शीट त्याच्या तोंडावर पडलेली दिसते. तेव्हा लगेच त्या व्यक्तीची मान खाली झुकते.  @RexChapman यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येणार आहेत.

First published:

Tags: Funny video, Pet animal, Social media viral, Viral, Viral videos