मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवीन कपडे खरेदी केलेत? परिधान करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

नवीन कपडे खरेदी केलेत? परिधान करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

नवे कपडे परिधान करायला कोणाला आवडत नाही, पण हेच नवे कपडे घालण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं तसेच काळजी घेणं गरजेच आहे. नाहीतर काही परिणामांना तोंड द्याव लागेल

नवे कपडे परिधान करायला कोणाला आवडत नाही, पण हेच नवे कपडे घालण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं तसेच काळजी घेणं गरजेच आहे. नाहीतर काही परिणामांना तोंड द्याव लागेल

नवे कपडे परिधान करायला कोणाला आवडत नाही, पण हेच नवे कपडे घालण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं तसेच काळजी घेणं गरजेच आहे. नाहीतर काही परिणामांना तोंड द्याव लागेल

  • Published by:  News Digital

प्रत्येकाला नवीन कपडे घालण्याची मिरवण्याची हौस असते. पण अनेकदा आपण घाई गडबडीत दुकानातून आणलेले किंवा ऑनलाईन मागवलेले कपडे तसेच घालतो. कोणतेही कपडे खरेदी केल्यानंतर ते घालण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणं तसेच काळजी (New Dress wearing Precautions)  घेणे गरजेचे असते. नाहीतर वाईच परिणामांना सामोर जावं लागू शकतं.

नक्की काय आहेत या बाबी, जाणून घेऊयात,

सॅनिटायझिंग (sanitizing the new cloth) करा

कोणत्याही प्रकारचे कपडे असोत, रोजचे घालण्याचे किंवा एखाद्या पार्टीत घालण्याचे, बॅण्डेड असोत किंवा लोकल मार्केट मधील कपडे खरेदी केल्यानंतर परिधान करण्यापूर्वी कपडे सॅनिटाईज करा. सध्या तर कोरोना काळ सुरू आहे त्यामुळे सॅनिटायझिंग नॉरमल आहे पण हा काळ संपल्यानंतरही सॅनिटायझिंग करणे गरजेचे आहे. ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे कारण फॅक्ट्रीत कपडे तयार होण्यासून ते दुकाणदाराकडे येईपर्यत अनेकांच्या हातातून गेलेले असतात. तर खरेदी करण्यापूर्वी अनेक लोकांनी ट्राय देखिल केलेले असतात. त्यामुळे कोरोनाच नाही तर आणखी कोणताही वायरस तुम्हाला धोका पोहोचवू शकतो. तेव्हा कपड्यांना सॅनिटाईज करणे जरूरी आहे.

फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं

कपडे धुवून वापरणे अधिक योग्य

कोणत्याही प्रकारचे कपडे असोत धुवून सुकवून घालणे कधीही योग्यच. जर डिझायनर, पार्टीत घालायचे कपडे असतील व घरी धुणे शक्य नसेल तर ड्राय क्लिनिंग करा. कपडे पॅकिंग करताना त्यावर अनेक केमिकल्सचा मारा केलेला असतो, जेणेकरूण किडे-धूळीपासून संरक्षण होईल. या कपड्यांना न धूता घातल्यास त्त्वचेचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे कपडे धुवूनचा घाला.

बटन आणि चैन तपासून पहा

कधी कधी आपण नवे कपडे आहेत म्हणून बेसावध राहतो. पण अनेकदा नवीन कपडे सुद्धा धोका देऊ शकतात बऱ्याचवेळा कपड्यांचे बटन किंवा चैन ठिक नसते तर एखाद्या ठिकाणी धागा निघालेला असतो. त्यामउले ऐनवेळी पंचायत होऊ नये य़ासाठी आधीच तपासून घेणं गरजेचे आहे.

फिटींग आणि शिलाई तपासणे

नविन कपडे घालण्यापूर्वी ते व्यवस्थित बसतात का हे तपासणे गरजेचे आहे. शिवाय सगळ्या बाजूंनी शिलाई बरोबर आहेना हेही पाहणं तितकच महत्त्वाचं आहे. जर धागे कमजोर असतील तर ऐन वेळी पंचायत होण्याची शक्यता असते. त्यामुले हे सगळं तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Lifestyle