मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचे आजी-आजोबा कमी का झोपतात माहिती आहे का? संशोधकांनी सांगितलं कारण

तुमचे आजी-आजोबा कमी का झोपतात माहिती आहे का? संशोधकांनी सांगितलं कारण

जसजसं वय वाढतं तसतशी झोप कमी लागते. वृद्धापकाळात झोपेची समस्या उद्भवण्याची काही कारणे आहेत.

जसजसं वय वाढतं तसतशी झोप कमी लागते. वृद्धापकाळात झोपेची समस्या उद्भवण्याची काही कारणे आहेत.

जसजसं वय वाढतं तसतशी झोप कमी लागते. वृद्धापकाळात झोपेची समस्या उद्भवण्याची काही कारणे आहेत.

मुंबई, 28 फेब्रुवारी : वाढत्या वयासोबत अनेकांना झोप न येण्याची समस्या (Sleeping Disorder Insomnia) जाणवू लागते. आधी झोप येत नाही किंवा झोप लागली आणि झोपमोड झाली तर परत झोप येत नाही, असं घरातल्या मोठ्या वयाच्या व्यक्तींना म्हणताना ऐकलं असेल. वय जसजसं वाढतं तशी झोपेची समस्या का जाणवू लागते. याबद्दल अमेरिकेतल्या (America) संशोधकांनी खूप संशोधन (research) केलं आहे. त्या संशोधनातून वृद्धांना झोपेविषयी येणाऱ्या समस्यांचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

मेंदूचा (Brain) जो भाग व्यक्तीच्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या स्थितीवर नियंत्रण ठेवतो, तो वाढत्या वयाबरोबर कसा कमकुवत होतो, हे शोधून काढल्याचा दावा अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Stanford University) शास्त्रज्ञांनी केला आहे.

वृद्धांच्या निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी औषधं (medicine) दिली जातात. परंतु वयानुसार या औषधांचा प्रभावदेखील कमी होऊ लागतो. असं का होतं? या प्रश्नावर संशोधकांचं म्हणणं आहे, की मेंदूच्या काही भागांमध्ये हायपोक्रेटिन्स (Hypocretins) ही विशेष रसायनं आढळतात. ती न्यूरॉन्सद्वारे (Neurons) सोडली जातात. वयानुसार मेंदूमधलं हे रसायन कमी होतं. त्यामुळे झोप न लागणं किंवा चांगली झोप न लागणं ही समस्या वाढत जाते.

हे वाचा - भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO

टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार वृद्धापकाळात झोप न येण्याची समस्या समजून घेण्यासाठी अमेरिकन शास्त्रज्ञांनी उंदरांवर (mouse) प्रयोग केला. त्यासाठी उंदरांचे दोन गट करण्यात आले. पहिल्या गटात 3 ते 5 महिने व दुसऱ्या गटात 18 ते 22 महिने वयाचे उंदीर होते. लाइटचा वापर करून उंदरांच्या मेंदूतले न्यूरॉन्स उत्तेजित करण्यात आले. यानंतर इमेजिंग टेक्नॉलॉजीने (Technology) मेंदूची तपासणी करण्यात आली. या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या. अहवालात असं दिसून आलं, की वयाने मोठ्या असलेल्या उंदरांनी लहान उंदरांपेक्षा 38 टक्के जास्त हायपोक्रेटिन गमावले होते.

संशोधकांचं म्हणणं आहे, की ‘संशोधनाच्या निकालांच्या मदतीने निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी उत्तम औषधं तयार करता येतील. वयानुसार औषधांचा कमी होणारा परिणाम नियंत्रित केला जाऊ शकतो. संशोधनाच्या परिणामांमुळे वृद्धांमध्ये निद्रानाशाच्या समस्येवर मात कशी करावी, याबद्दल अनेक गोष्टी समजण्यास मदत होईल,’ असंही संशोधकांना वाटतं.

हे वाचा - फक्त हिच्या शरीरावरील केसांसाठी उतावळे पुरुष; BODY HAIR विकूनच कमावते लाखो रुपये

संशोधक लुईस डी लेसिया म्हणतात, ‘65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती त्यांना चांगली झोप येत नाही, अशी तक्रार करतात. मानवी झोपेचा संबंध उच्च रक्तदाब (High blood pressure), हृदयविकाराचा झटका (heart attack), मधुमेह (Diabetes), नैराश्य (depression) या आजारांशीसुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीला हे आजार असतील, तर त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि निद्रानाशाची समस्या वाढते.’

First published:

Tags: Lifestyle, Sleep