मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फक्त हिच्या शरीरावरील केसांसाठी उतावळे पुरुष; BODY HAIR विकूनच महिन्याला कमावते लाखो रुपये

फक्त हिच्या शरीरावरील केसांसाठी उतावळे पुरुष; BODY HAIR विकूनच महिन्याला कमावते लाखो रुपये

गेली 4 वर्षे या महिलेने आपल्या शरीरावरील केस काढले नाहीत. हेच केस विकून ती 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवते.

गेली 4 वर्षे या महिलेने आपल्या शरीरावरील केस काढले नाहीत. हेच केस विकून ती 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवते.

गेली 4 वर्षे या महिलेने आपल्या शरीरावरील केस काढले नाहीत. हेच केस विकून ती 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवते.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 28 फेब्रुवारी :  आपल्या शरारीवरील केस कुणाला आवडतात. शक्यतो कुणालाच नाही. महिलाच नव्हे तर अगदी पुरुषही शरीरावरील नको असलेल्या भागावरील केस काढून टाकतात (Body hair removal). शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करतात (How to shave body hair?). शरीरावरील केस काढण्यासाठी पैसे मोजतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र आपल्या शरीरावरील याच केसांमार्फत मोठी कमाई करत आहेत (London woman sell body hair). लाखो रुपये ती कमवत आहे (England woman doesn’t shave body hair).

यूकेमध्ये राहणार 25 वर्षांची कॅमिली अॅलेक्झांडर (Camille Alexander) एक म्युझिशिअन आणि मॉडेल आहे. तिने जवळपास 4 वर्षांपूर्वी वॅक्सिंग आणि शेव्हिंग करणं सोडलं आणि तिने आपल्या शरीरावरील नैसर्गिक केसांचा स्वीकार केला म्हणजे ते केस तिने जसेच्या तसे ठेवले. आता ती आपले बॉडी हेअर कधीच काढत नाही (woman earn 2 lakh rupees selling hair).

आपला समाज पुरुष आणि महिलांच्या फॅशनबाबत नियम ठरवतं आणि मग त्यानुसारच चालतं. या नियमानुसार महिलांनी आपल्या शरीरावरील केस काढायला हवेत, जेणेकरून ती सुंदर दिसेल आणि पुरुषांनी आपल्या शरीरावरील केस कधीच काढू नयेत नाहीतर त्यामुळे त्यांच्यातील पुरुषार्थ समजेल. पण यूकेतील या महिलेने समाजाने तयार केलेले हे नियम मोडले आहेत आपल्या शरीरावरील केस ती कधीच काढत नाही.

हे वाचा - दिसायला सुंदर तरी सिंगल! शेकडो तरुणांना डेट करूनही मॉडेलला मिळाला नाही पार्टनर

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार  तिने सांगितलं की शरीरावरील केस यासाठी काढत नाही कारण पैसे कमाईसाठी ही चांगली संधी आहे कारण कित्येक पुरुषांना महिलांना असं पाहण्याची इच्छा असते. त्यांना केस असलेली महिला पाहायची असते.

एका ग्राहकाने महिलेकडे तिचे अशा हेअर ब्रशची मागणी केली ज्यावर तिचे केस असतील. हा हेअर ब्रश त्या व्यक्तीला खरेदी करायचा होता. इतकंच नव्हे तर जेव्हा ती आपले प्रायव्हेट पार्टवरील केस कापेल तेव्हाही ते खरेदी करायचे असल्याचं त्या ग्राहकाने सांगितलं. एकदा त्या ग्राहकाने तिचं अंडरवेअर 30 हजार रुपयांत खरेदी केलं.

हे वाचा - घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

ती ओन्ली फॅन्स वेबसाईटवर आपले न्यूड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नाही, तरी ती महिन्याला  2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवते.

First published:

Tags: Viral, Viral news, Woman hair