Home /News /lifestyle /

OMG! चिमुरड्यांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता हवेत उंच गेले आजोबा आणि...; VIDEO VIRAL

OMG! चिमुरड्यांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता हवेत उंच गेले आजोबा आणि...; VIDEO VIRAL

अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे आजोबा मनसोक्तपणे झोका (old man swinging) घेत होते.

    मुंबई, 18 मार्च :  झोपाळा (swing) म्हटलं की त्यावर झुलण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. गार्डनमध्ये गेल्यानंतर तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे असतात. यावर बहुतेक वेळा मोठ्या माणसांना बसण्याची परवानगी दिली जात नाही. कारण ते तुटण्याची शक्यता असते. पण तरी कित्येक जण या झोपाळ्यावर बसण्यापासून स्वतःला आवरू शकत नाही आणि काही वेळ का होईना झोपाळ्यावर बसून उंच उडण्याचा आनंद ते लुटतातच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यात एक आजोबा लहानग्यांच्या झोपाळ्यावर (Old man swinging) मनसोक्तपणे झुलताना दिसत आहेत. पण झोपाळ्यावर झुलताना ते जे काही करतात ते अगदी तरुणांना थक्क करून टाकणारं आहे. बिझनेसमॅन हर्ष गोएंका ((Harsh Goenka) यांनी आपल्या सोशल मीडियावर झोपाळ्यावरील आजोबांचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता आजोबा अगदी मजेत झोका घेत आहेत. अगदी उंचापर्यंत ते झोपाळा नेत आहेत. झोपाळा झुलवत ते हवेत उंचावर नेतात आणि... व्हिडीओ पाहताच धडकी भरते. झोपाळ्यावर बसून उंचच उंच जाणारे आजोबा हवेतच स्टंट करतात. त्यांचा हा स्टंट पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. हे वाचा - तरुणींच्या स्टंटला नेटकऱ्यांकडून मिळाली वाह वाह!पोलिसांच्या कारवाईनं घडवली अद्दल जसजसं व्यक्तीचं वय वाढतं तसतसं त्याच्यातील एक मूलही पुन्हा जन्माला येतं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असल्याचंच म्हटलं जातं. त्यामुळेच आजी-आजोबा आपल्या नातंवडांसोबत खेळता खेळता अगदी लहानच होतात. अगदी असंच बालपण या आजोबांमध्ये दिसून येतं आहे. पण त्याचवेळी जेव्हा ते स्टंट करतात तेव्हा ते पाहून एखाद्या तरुणालाही लाज वाटेल, इतकं भारी आहे. हे वाचा - भररस्त्यात तरुणीचं अपहरण, आसपासच्या लोकांनी काय केलं याचीच चर्चा; Video Viral आजोबांचा हा व्हिडीओ पाहून हर्ष गोएंकादेखील हैराण झाले. त्यांनादेखील हे आजोबा खूप आवडले आहेत. यांनी हा व्हिडीओ शेअर करताना स्वॅग इतकंच कॅप्शन याला दिलं आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तो आवडला आहे. या आजोबांचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कुणी एकदम झक्कास म्हटलं आहे, तर कुणी टशनमध्ये. सोशल मीडियावर याच आजोबांची चर्चा होते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Lifestyle, Old man, Viral, Viral videos

    पुढील बातम्या