• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • तरुणींच्या स्टंटला सोशल मीडियावर मिळाली वाह वाह! पोलिसांच्या कारवाईनं मात्र अद्दल घडवली

तरुणींच्या स्टंटला सोशल मीडियावर मिळाली वाह वाह! पोलिसांच्या कारवाईनं मात्र अद्दल घडवली

दोन पैलवान तरुणींना त्यांनी केलेल्या मोटरसायकलच्या स्टंटमुळे (Viral Video of Bike Stunt) प्रसिद्धी तर मिळाली पण पोलिसांनी त्यांना 28 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवांगी दबस आणि स्नेहा रघुवंशी अशी हा स्टंट करणाऱ्या मुलींची नावं आहेत.

  • Share this:
वाराणसी 18 मार्च : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Viral on Social Media) करण्यासाठी सध्या अनेकजण काहीही विचित्रपणा करताना दिसतात. त्या व्हिडिओंना हजारो लाईक मिळतात आणि विचित्रपणा करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळाल्याचं समाधान. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये असलेल्या दोन पैलवान तरुणींना त्यांनी केलेल्या मोटरसायकलच्या स्टंटमुळे (Viral Video of Bike Stunt) प्रसिद्धी तर मिळाली पण पोलिसांनी त्यांना 28 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवांगी दबस आणि स्नेहा रघुवंशी अशी हा स्टंट करणाऱ्या मुलींची नावं आहेत. स्नेहा आणि शिवांगीनी लाल रंगाचा टीशर्ट आणि काळी डेनिम जीन्स घातली आहे. स्नेहा विना हेल्मेट मोटरसायकल चालवत आहे आणि शिवांगी तिच्या खांद्यावर बसली आहे तिच्याही डोक्यावर हेल्मेट नाही. हा फोटो स्थानिक पोलिसांनी या दोघींना पाठवून रस्ते वाहतुकीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. या दोघींनी गाझियाबादमधील मधुबन बापूधाम या परिसरात हा स्टंट केला. तो शूट केला आणि इन्स्टाग्रमावर अपलोड केला. नेटिझन्सनी त्यांचं कौतुक केलं पण गाझियाबाद पोलिसांनी मात्र त्यांना कायदा मोडल्याबद्दल नोटीस पाठवून त्यांचं कृत्य चुकीचं असल्याचं दाखवून दिलं आहे. स्टंटमध्ये वापरलेली एक बाईक मंजू देवी यांची आहे तर दुसरी संजय कुमार यांची. शिवांगी आणि स्नेहा या पैलवान असून त्यांनी स्टंटसाठी त्यांच्याकडून बाइक उसन्या घेतल्या होत्या. मंजू देवींना पोलिसांनी 11 हजार तर संजय कुमार यांना 17 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियानं आपल्या वृत्तात दिली आहे. शिवांगी म्हणाली, ‘ आम्ही या स्टंटचा सराव केला होता आणि शनिवारी आम्ही मधुबन बापूधाम या सुरक्षित ठिकाणी तो स्टंट करून त्याचा व्हिडिओ शूट केला. मी तो इन्स्टाग्रामवर टाकला. तो व्हायरल झाल्यामुळे माध्यमांच्या नजरेत आला आणि त्यामुळेच आम्हाला पोलिसांची नोटीस आली.’ आम्ही विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चलन कापण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या परवानगीशिवाय स्टंट करणं, बनावट नंबर प्लेट वापरणं, ट्रिपल सीट रायडिंग या नियमांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे. थोड्या दिवसांच्या अंतराने असे दोन व्हिडिओ शूट केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या आधी गुजरातमधील सुरतमध्ये एका मुलीने हेल्मेट आणि कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनांविना भर रस्त्यावर असे स्टंट केले होते. तेव्हा पोलिसांनी भारतीय संविधानाच्या कलम 279, 188, 269 आणि एपिडेमिक डिसिजेस अॅक्टअंतर्गत त्या मुलीवर गुन्हा दाखल केला होता. संजना उर्फ प्रिन्सी प्रसादने इन्स्टाग्रामवर असे स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला त्यानंतर ही घटना घडली होती. पोलिसांनी संजनाला अटक केली होती. संजनाने हा व्हिडिओ वेसु आणि गौरव पथ या परिसरात शूट केला होता. नंतर संजनाला जामिनावर सोडण्यात आलं. अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस एकदम दक्ष राहून कडक कारवाई करत आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवरून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांनाही ते दंड करत आहेत असंही पोलिसांनी सांगितलं.
Published by:Kiran Pharate
First published: