मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ऑफिसमध्ये प्रचंड वर्क प्रेशर आहे का? तर फॉलो करा 'या' टिप्स

ऑफिसमध्ये प्रचंड वर्क प्रेशर आहे का? तर फॉलो करा 'या' टिप्स

कामाचा ताण

कामाचा ताण

ऑफिसमध्ये कामाचं प्रचंड प्रेशर येत असेल तर लगेच त्यावर विचार करा. स्ट्रेस घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 03 नोव्हेंबर:  प्रत्येक व्यक्ती ऑफिसमध्ये आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. लवकर आणि चांगल्या पद्धतीनं काम पूर्ण केल्यास ग्रोथ आणि काम या दोन्हींवर सकारात्मक परिणाम होतो. पण, कधी-कधी जास्त कामामुळे मानसिक आणि शारीरिक ताण येतो. मनावर दडपण जाणवत असल्यास काम व्यवस्थित होत नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करू शकता.

  आठवणीनं ब्रेक घ्या

  ऑफिसचा ताण दूर करण्यासाठी थोडा वेळ बाहेर फिरायला जाऊ शकता. ऑफिसचं काम आटोपून अधून-मधून रिफ्रेशिंग वॉक घेतल्यानं पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते. डोकं शांत होऊन मूड चांगला होता. कामातून थोडा ब्रेक घेतल्यास ऑफिसच्या कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

  कामाचं नियोजन करा

  योग्य नियोजन केल्यास कोणतंही काम व्यवस्थित पूर्ण होतं, ही बाब तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे ऑफिसमधील दिवसभराच्या कामाचंही योग्य नियोजन करा. कोणतं काम केव्हा आणि कसं करावं, हे निश्चित करा. जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर, प्रत्येक प्लॅन आणि कामासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहू शकाल. ऑफिसमधील कामाच्या दडपणानं तुम्ही विचलित होणार नाही. शिवाय, तुमची सर्व कामं तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल.

  हेही वाचा - वजन घटवण्याच्या या मार्गाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

  सकारात्मकता ठेवा

  ऑफिसमध्ये तुम्ही वर्तन सकारात्मक ठेवलं पाहिजे. कधी-कधी एखाद्या कामाबद्दल नकारात्मक दृष्टिकोण तयार होतो. याचा कामावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शांत आणि सकारात्मक राहून काम पूर्ण करा. तुम्ही सकारात्मक असाल तर प्रत्येक प्रोजेक्ट अगदी सहजतेने पूर्ण करू शकाल.

  मल्टिटास्किंग करू नका

  ऑफिसमध्ये मल्टिटास्किंग केल्यानं दडपण वाढत जातं. त्यामुळे त्यापासून दूर राहा. ऑफिसमधील गॉसिपमुळेही कधी-कधी मानसिक ताण येतो. सतत गॉसिपकडे लक्ष दिल्याने कामात अडथळा येतो आणि कामाचा वेग कमी होतो. तुमच्या हातातील प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होत नाहीत. यामुळे विनाकारण दबाव वाढतो. म्हणून मल्टिटास्किंग आणि गॉसिपपासून दूर राहा.

  योगा करा

  योगामुळे तणाव दूर होतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन व्यायामामध्ये योगाचा समावेश करा. अशी अनेक आसनं आहेत जी तणाव कमी करतात. त्यांच्यामुळे मानसिक आणि शारीरिक बळ मिळतं. कमी तणावात तुम्ही कोणतंही काम सहज करू शकता.

  हेही वाचा - जेवताना घडणाऱ्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; भविष्यात येऊ शकतात अडचणी

  दीर्घश्वसन करा

  जेव्हा ऑफिसमध्ये कामाचा ताण येईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या. ही क्रिया स्ट्रेस बूस्टरचं काम करते. ताण आल्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यास आराम मिळेल आणि पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळेल. सातत्यानं दीर्घ श्वास घेतल्यास कामाची आवडही पूर्वीपेक्षा वाढू शकते.

  स्मार्टफोनचा वापर टाळा

  ऑफिसच्या कामादरम्यान सतत मोबाईल बघितल्यानंही ताण येऊ शकतो. म्हणून ऑफिसमध्ये सतत मोबाईल बघण्याची सवय बंद करा. सतत फोन बघण्यात व्यस्त असल्यामुळे काम वेळेत पूर्ण होत नाही. कधी-कधी कामादरम्यान महत्त्वाचे कॉल्स येतात. आपण असे फोन उचलू शकत नाही. त्यामुळे विनाकारण चिडचिड होते. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ऑफिसच्या वेळा सांगू शकता. असं केल्यास ऑफिसच्या वेळेत तुम्हाला ते फोन करणार नाहीत.

  वरील टिप्स लक्षात ठेवल्यास ऑफिसमधील वर्क प्रेशरचा तुम्ही चांगल्या प्रकारे सामना करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Work from home