जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 120 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये खिशात; एका रात्रीत ड्रायव्हर झाला मालामाल

120 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये खिशात; एका रात्रीत ड्रायव्हर झाला मालामाल

120 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये खिशात; एका रात्रीत ड्रायव्हर झाला मालामाल

आपण करोडपती झालो यावर या ड्रायव्हरलाही विश्वास बसत नव्हता.

  • -MIN READ
  • Last Updated :

सेबक देब शर्मा/भुवनेश्वर, 11 डिसेंबर : शॉपिंगमध्ये डिस्काऊंट, ऑनलाइन पेमेंट करताना कॅशबॅक ऑफर आणि मिळणारी सूट… खिशातून पैसे जात असताना त्यातील काही वाचत असतील किंवा त्याच्याबदल्यात आपल्याला काही पैसे मिळत असतील तर त्याचा आनंद काय असतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही.   मग ती अगदी क्षुल्लक रक्कम का असेना पण त्याचा आनंद काही निराळाच असतो. पण जर फक्त शंभर रुपयांच्या बदल्यात तुम्हाला कोट्यवधी रुपये  मिळाले तर… वाचूनच धक्का बसला ना. मग विचार करा ज्याचं नशीब इतकं फळफळलं आहे त्याला किती मोठा धक्का बसला असेल. मालदातल्या एका व्यक्तीनं 120 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये जिंकले आहेत. मोहम्मद रमजान अली असं या करोडपतीचं नाव आहे. तो एक ड्रायव्हर आहे. एका रात्रीत तो मालामाल झाला आहे. फक्त एका लॉटरीनं त्याचं नशीबच बदलून टाकलं.

null

आर्थिक परिस्थिती गरीबी आणि कुटुंबाच्या समस्यांशी झुंज देणारा रमजान कधी कधी लॉटरीचं तिकीट खरेदी करायचा. नशीब असेल तर कधी ना कधी आपल्याला लॉटरी लागेल असं त्याला वाटायचा. त्याचा हा विश्वास खरा ठरला. एक दिवस त्याला लॉटरी लागलीच तीसुद्धा एक कोटी रुपयांची. हे वाचा -  बायकोसाठी कायपण! प्रसिद्ध कंपनीच्या CEO ने सोडला तब्बल 750 कोटी रुपयांचा बोनस रमजाननं गुरुवारी 120 रुपये खर्च करून लॉटरी खरेदी केली. घरी आल्यानंतर त्याला समजलं आपण लॉटरीचे एक कोटी रुपये जिंकलो आहेत. सुरुवातीला त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्याच्याकडून त्यान तिकीट घेतलं होतं तो तिकीट विक्रेता आणि रमजानच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याला आपल्या लॉटरीचा नंबर तपासायला सांगितला. त्यानंतर त्याला धक्काच बसला. तो त्याच्याच लॉटरीचा नंबर होता. रमजान कोट्यवधी रुपयांचा मालक झाला होता. करोडपती रमजानला भेटण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही येऊ लागले. लोकांची इतकी गर्दी झाली की आवरण्यासाठी पोलिसांना बोलावावं लागलं. रिपोर्टर्सच्या त्याच्या घराबाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. हे वाचा -  2020 मधलं हिट App : बंदी असूनही TikTok ने FB, इन्स्टा, whatsapp ला टाकलं मागे रमजानच्या कुटुंबात सात सदस्य आहेत. त्याला नोकरी नाही म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. एक कोटीची लॉटरी जिंकल्यानंतर आता आपले दिवस पालटणार, असं रमजान म्हणाला. या पैशातून सर्वात आधी एक जमीन घेऊन घर बांधणार असल्याचं त्यानं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात