Home /News /lifestyle /

'नवा CORONA अधिक संसर्गजन्य पण...', केंद्र सरकारनं दिली नवी माहिती

'नवा CORONA अधिक संसर्गजन्य पण...', केंद्र सरकारनं दिली नवी माहिती

कोरोनाव्हायरसच्या नव्या रूपाबाबत (COVID 19 New strain) आता अधिक उलगडा झाला आहे.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर :  ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाव्हायरसचा नवा अवतार (Mutated Coronavirus strain in UK) सापडल्यानंतर संपूर्ण जगानं धसका घेतला आहे. कोरोनाचं हे नवं रूप (covid 19 new strain) अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे. म्हणजे हा कोरोना वेगानं पसरतो आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराबाबत आता नवा उलगडा होतो आहे. केंद्र सरकारनं याबाबत अधिक माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जातं आहे. यूकेमध्ये SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या  D614G म्युटेशनमध्ये बदल होऊन नवा स्ट्रेन तयार झाला आहे. नव्या बदलामध्ये 23 जेनेटिक बदल दिसून आले आहेत. अपेक्षेपेक्षा हे बदल जास्त असल्याचं तज्ज्ञ म्हणाले. हे वाचा - कोरोनाचा नवा अवतार किती भयंकर? WHO नं दिलं उत्तर म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV - 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो. या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदलेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70% जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहं. शास्त्रज्ञांना अशीही भिती वाटते आहे, की कोट्यवधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रूप बदलण्यासाठी कोरोनाव्हायरस प्रवृत्त होऊ शकतो. हे वाचा - लंडनहून भारतात आलेल्या विमानात सापडले 5 कोरोना पॉझिटिव्ह काही तज्ज्ञांच्या मते, मात्र कोरोना किंवा कुठलाही व्हायरस रुप बदलत राहणारच. हे व्हायरस नष्ट होतील की तसेच जिवंत राहतील हे मानवी प्रतिकारशक्तीवर हे अवलंबून असेल. शिवाय म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटिनच्या संरचनेत एका विशिष्ट जागी बदल होतो आणि लस मात्र स्पाइक प्रोटिनच्या विविध भागांवर मारा करते, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या