नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : हेल्दी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीट किंवा बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलड्साठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते. आज आपण बीटचे सर्व फायदे जाणून घेऊया. बीटचे आरोग्य फायदे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त WebMD.com च्या माहितीनुसार, आजकाल बहुतेक लोकांसाठी उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. त्यावर पोषक तत्वांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीट हा फोलेटचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. पचनासाठी फायदेशीर - बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. चांगल्या पचनासह, बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो. कामात स्टॅमिना वाढतो - तज्ज्ञांच्या मते, बीटरूटचे सेवन स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. नियमित बीटरूट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ऍथलेटिक कामगिरी सुधारते. सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी तुम्ही कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी सुमारे 2 तास आधी बीटचा रस घेऊ शकता.
मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर - मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो, त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बीटरूट नायट्रेट्सने समृद्ध आहे, त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतो. बीटचे नियमित सेवन केल्याने मेंदूची स्मरणशक्तीही सुधारते. हे वाचा - हिवाळ्यातही हवीये कोरडी, मुलायम त्वचा? तर ‘हे’ आहेत घरगुती स्वस्तात मस्त उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला)