जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिवाळ्यातही हवीये कोरडी, मुलायम त्वचा? तर 'हे' आहेत घरगुती स्वस्तात मस्त उपाय

हिवाळ्यातही हवीये कोरडी, मुलायम त्वचा? तर 'हे' आहेत घरगुती स्वस्तात मस्त उपाय

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा

थंडीमुळे त्वचा कोरडी होतेच, शिवाय लालसर डागही येतात. विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेवर थंडीचा खूप लवकर परिणाम होतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 नोव्हेंबर:   उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळा आरोग्यासाठी उत्तम ऋतू समजला जातो; मात्र त्वचेचे आजार असणाऱ्यांना हा ऋतू अजिबात आवडत नाही. त्याचं कारण हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होते. थंडीमुळे पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा निस्तेज व भेगाळलेली दिसू लागते. काही घरगुती उपायांमुळे कोरडी त्वचा सतेज व मुलायम बनू शकते. थंडीच्या दिवसांत घरात उपलब्ध काही पदार्थ कोरड्या त्वचेला संजीवनी देऊ शकतात. ’ थंडीमुळे त्वचा कोरडी होतेच, शिवाय लालसर डागही येतात. विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेवर थंडीचा खूप लवकर परिणाम होतो. त्यामुळे थंडीमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात. दुधाची साय आणि हळद दुधाच्या सायीमध्ये खूप जास्त तेलकट अंश असतो. त्यामुळे थंडीतही त्वचा मऊ राहते. सायीमध्ये चिमूटभर हळद घालून ती पेस्ट चेहरा, मान, हात व पायाला लावल्यास कोरडी त्वचा मुलायम बनते. हेही वाचा - लघवी करताना जळजळ होते म्हणून रुग्णालयात गेले; 79 वर्षीय आजोबांचा प्रताप पाहून डॉक्टरही हादरले खोबरेल तेल आपल्याकडे वर्षानुवर्षं खोबरेल तेल केसांसाठी वापरलं जातं. हे तेल त्वचेसाठीही तितकंच गुणकारी ठरतं. रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश केल्यास त्वचा सुंदर होते. चेहऱ्यावरही हलक्या हाताने खोबरेल तेल लावून रात्रभर तसंच ठेवावं. अशा पद्धतीनं नियमितपणे खोबरेल तेलाचं मालिश केल्यास त्वचा कोरडी पडत नाही. ऑलिव्ह ऑइल आणि दूध त्वचा खूप जास्त रुक्ष आणि कोरडी असल्यास ऑलिव्ह ऑइलचा वापर उपयुक्त ठरतो. त्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावं. कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. बदाम तेल आणि मध त्वचेसाठी बदामाचं तेल आणि मध यांचं मिश्रण उपयोगी असतं. बदामाचं तेल आणि मध दोन्ही घटक सारख्याच प्रमाणात घ्यावेत. ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावावं. थोड्या वेळानं चेहरा धुऊन टाकावा. या उपायामुळे त्वचेतला रुक्षपणा निघून जाईल व त्वचा मुलायम होईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    थंडीत त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेला खाज सुटणं, हुळहुळणं, लाल चट्टे उठणं असे त्रास होऊ शकतात. खूप जास्त कोरडी त्वचा असल्यास त्वचेवर पांढरट पापुद्रेही दिसू लागतात. म्हणूनच थंडीचा ऋतू सुरू झाल्याबरोबर त्वचा कोरडी पडू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. त्वचेला त्रास होऊ नये, म्हणून मऊ कपडे वापरले पाहिजेत. तसंच हीटर किंवा एसीचा थेट झोत अंगावर घेऊ नये. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरगुती घटकांचा वापर करून त्वचा मऊ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात