नारळाचं पाणी मानवी शरीराला अनेक गंभीर आजारांपासून लढण्याची ताकद देतं. यातील पोषक तत्त्व शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करत शरीराला हायड्रेट ठेवण्यात मदत करतं. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि डायरियासारखे आजारांत शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. नारळाच्या पाण्याच्या फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 2 सप्टेंबरला वर्ल्ड कोकोनट डे साजरा केला जातो.
उच्च रक्तदाबसारख्या गंभीर स्थितीत नारळाचं पाणी फायदेशीर आहे. यातले विटामिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. तसंच हायपर टेंशनलाही नियंत्रणात ठेवतं.
नारळाचं पाणी हे कोलेस्ट्रॉल आणि फॅट- फ्री असल्यामुळे हृदयासाठी फार चांगलं असतं. याशिवाय याचं अँटीऑक्सिडंट गुणही सर्कुलेशनवर सकारात्मक प्रभाव टाकतो.
हँगओवर झालं असेल तर त्यावर नारळाचं पाणी प्यावं. एका नारळात 200 मिलीलीटर किंवा त्याहून जास्त पाणी असतं. याशिवाय हे एक लो-कॅलरा ड्रिंंक आहे.
डोक्याशी निगडीत अनेक समस्याही जास्तकरून डिहायड्रेशनमुळे होतात. अशात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला लगेच इलेक्ट्रोलाइट्स पोहोचवण्यातं काम करतं. यामुळे हायड्रेशनची स्थिती सुधारते.