जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो? या लोकांमध्ये असतात खास वैशिष्ट्यं

तुमचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो? या लोकांमध्ये असतात खास वैशिष्ट्यं

तुमचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो?

तुमचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो?

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्यामध्ये अशा अनेक खास गोष्टी असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 31 ऑक्टोबर : प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर ग्रह, राशी आणि नक्षत्रांप्रमाणेच वार, महिना, तिथीचाही परिणाम होत असतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. खरं तर वर्षातला प्रत्येक महिना खास असतो. एखाद्या व्यक्तीचा ज्या महिन्यात  वाढदिवस  असतो, त्या महिन्याचे गुणधर्म त्या व्यक्तीच्या स्वभावात दिसून येतात. आता 2022 या वर्षातला अकरावा म्हणजेच नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. ज्या व्यक्तींचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला आहे, अशा व्यक्ती अनेक गुणांनी संपन्न असतात. तसंच नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर गुरू ग्रहाची विशेष कृपा असते, असं ज्योतिषशास्त्राचे जाणकार सांगतात. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आकर्षक आणि सर्जनशील असतात. तसंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखीही काही वैशिष्ट्यं पाहायला मिळतात. त्याविषयी जाणून घेऊ या. `नवभारत टाइम्स`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्य व्यक्ती अन्य व्यक्तींच्या तुलनेत काहीशा खास असतात. त्यांच्या स्वभावात विशेष गुण असतात. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान , विन्स्टन चर्चिल, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी , क्रिकेटपटू विराट कोहली , अभिनेत्री ऐश्वर्या राय , सानिया मिर्झा, प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी , ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, अभिनेता कमल हसन , यामी गौतम आणि महान कवी हरिवंशराय बच्चन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झालेला आहे. या व्यक्तींकडे असलेली कौशल्यं, खास गुण यावरून तुम्हाला नोव्हेंबर महिन्याची वैशिष्ट्यं समजू शकतील. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर गुरू ग्रहाची विशेष कृपा असते. 1 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींची रास वृश्चिक मानली जाते. मंगळ हा ग्रह या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या कालावधीत जन्मलेल्या व्यक्ती साहसी, महत्त्वाकांक्षी असतात. 22 नोव्हेंबरनंतर जन्मलेल्या व्यक्तींची रास धनू मानली जाते. धनू राशीचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. त्यामुळे या व्यक्तींना करिअर आणि व्यापारात विशेष यश मिळतं. त्यांना जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. वाचा - वाढत्या वयासोबत मासिक पाळीत होतात हे मोठे बदल, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळते. या व्यक्ती ऐकीव माहितीवर किंवा एखाद्याच्या सांगण्यावर कधीही विश्वास ठेवत नाहीत. या व्यक्तींचा केवळ स्वतः पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींवर विश्वास असतो. सारासार विचार केल्याशिवाय ते कोणाच्याही म्हणण्यावर विश्वास ठेवत नाहीत. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती हुशार, तसंच आकर्षक असतात. या व्यक्तींना साधेपणा आवडतो आणि त्यांची ही शैली त्यांना लोकप्रिय बनवते. यामुळे दुसऱ्या व्यक्तींनाही त्यांचा हेवा वाटू लागतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्यांमध्ये सर्जनशीलता पाहायला मिळते. नेहमी काही तरी वेगळं केलं पाहिजे, या गोष्टीवर ते विश्वास ठेवतात. यांचे विचार अन्य व्यक्तींपेक्षा वेगळे असतात. या व्यक्ती सदैव आपल्या मर्जीप्रमाणे भविष्यातल्या गोष्टींचं नियोजन करतात. या व्यक्ती प्रत्येक कामातून दमदार आउटपुट देतात. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती प्रायव्हसीबाबत कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यांना चलाख व्यक्तींपासून दूर राहायला आवडतं. त्यामुळे त्यांना मित्रदेखील मर्यादित असतात; मात्र जे मित्र असतात, त्यांच्याशी या व्यक्ती उत्तम मैत्री शेवटपर्यंत निभावतात. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती शांत, दयाळू आणि सज्जन असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात