मुंबई, 28 मे : प्रेग्नन्सी टेस्ट (Pregnancy Test) ही तर महिलांसाठी असते, मग तुम्ही पुरुषांना (Men's Pregnancy Test) काय विचारताय... तुमचा मथळा चुकला आहे. असंच हा मथळा पाहता क्षणी वाटेल. आमच्याकडून मथळा लिहिण्यात काहीतरी चूक झाली, असंच तुम्ही मानाल आणि कदाचित आमची चूक दाखवून देण्याचा प्रयत्नही कराल. पण हा कोणताही टायपो नाही बरं का? आमचा हा प्रश्न महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठीच आहे.
एखादा पुरुष प्रेग्नंट आहे, हे तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. अनेकदा पुरुष बाळाला जन्म देऊ शकतात का याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसते. परंतु असं होणं अशक्य असल्यानं ही चर्चा कधीही निष्कर्षाच्या पातळीवर येत नाही. पुरुष प्रेग्नंट होत असोत किंवा नसोत हा मुद्दा बाजूला ठेवा पण तरीही पुरुषांनीही महिलांप्रमाणे प्रेग्नन्सी चाचणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती नसेल पण जर पुरुषांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली तर त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईल.
हे वाचा - अरे बापरे! तोंडाबाहेर लटकतेय जीभ; कोरोना रुग्णाला झाला भलताच साइड इफेक्ट
जर एखाद्या पुरुषाची प्रेग्नसी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर अशी शंका मनात निर्माण होऊ शकते. परंतु अशी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तरी त्याचा अर्थ तो पुरुष मूल जन्माला घालणार आहे असा होत नाही. तर हे पुरुषाला होणाऱ्या गंभीर आजाराचं लक्षण आहे. जेंटसाईड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर संबंधित पुरुषाला टेस्टीक्युलर कॅन्सर (Testicular Cancer) झाल्याचं संकेत समजला जातो.
टेस्टीक्युलर कॅन्सर हा पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरच्या विविध प्रकारांच्या तुलनेत 1 टक्के होणारा कॅन्सर मानला जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. टेस्टीक्युलर कॅन्सरच्या काही प्रकारांमध्ये एक प्रकारचं हार्मोन प्रवाहित होतं. त्यामुळे एखाद्या पुरुषानं प्रेग्नसी टेस्ट केली आणि या टेस्टमधून संबंधित पुरुषाच्या युरिनमध्ये हे हार्मोन आढळून आलं तर त्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं शक्य आहे. प्रेग्नसी टेस्टच्या माध्यमातून टेस्टीक्युलर कॅन्सरच्या काही प्रकारांची तपासणी करणंदेखील शक्य आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की दर महिन्याला टेस्ट किटच्या स्ट्रिपवर युरिन करणं आवश्यक आहे.
हे वाचा - चाळीशीनंतरही राहायचं आहे Fit and Fine; पुरुषांसाठी खास Diet plan
रिपोर्टनुसार केल्सी-सेबोल्ड क्लिनिकचे यूरोलॉजिस्ट डॉ. फिलीप यांनी सांगितलं की विवाहित पुरुषाने जर प्रेग्नसी टेस्टकिटमधील स्ट्रीपवर युरिन (Urine) केली तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र याचा अर्थ तो मूल जन्माला घालणार असा नसून, तो टेस्टीक्युलर कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे असं स्पष्ट होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Health, Pregnancy, Serious diseases, Test