वाराणसी, 27 जुलै : विविधतेत एकता असं वैशिष्ट्य असलेल्या आपल्या देशात अनेक जाती, धर्म, पंथ असल्यानं अनेक संस्कृती इथं एकत्र नांदतात. त्याप्रमाणे अनेक भाषाही (Languages) बोलल्या जातात. काही बोली भाषा काल ओघात नष्टही झाल्या आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र व्यवहारात सर्वाधिक वापरली जाते इंग्रजी (English) आणि त्यानंतर हिंदी(Hindi). इंग्रजी ही जगाची व्यवहाराची भाषा असल्यानं प्रादेशिक भाषांबरोबर इंग्रजी येणं अत्यावश्यक झालं आहे. त्यामुळं शाळेमध्येही प्रादेशिक भाषेबरोबर इंग्रजी आणि हिंदी प्राधान्य क्रमाने शिकवल्या जातात. या सगळ्या प्रकारात सर्व भारतीय भाषांची जननी मानली जाणारी प्राचीन वारसा असलेली संस्कृत (Sanskrit) भाषा मात्र हळूहळू लयाला चालली आहे. स्कूपवूप या हिंदी वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे. आपल्या देशाच्या राज्य घटनेत (Constitution) 8 व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये संस्कृत भाषेचा समावेश आहे. ‘देववाणी’ किंवा ‘सुरभारती’ म्हणून ओळखली जाणारी ही भाषा आता लोप पावत चालली आहे. तरीही काही समुदाय ही भाषा टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. ही भाषा टिकवण्यासाठी जीवापाड कष्ट घेणारे असेच एक शिलेदार आहेत वाराणसीतील(Varanasi) वकील(Lawyer) आचार्य श्याम उपाध्याय(Achara Shyam Upadhya). आपल्या देशात न्यायालयीन कामकाज (Court Work) बहुतेक इंग्रजी किंवा हिंदीतून चालतं. देशभरातील वकीलही सर्व न्यायालयीन काम हिंदी आणि इंग्रजीमधून करतात; पण कोणीही संस्कृत भाषेचा वापर करत नाही. मात्र आचार्य श्याम उपाध्याय हे एकमेव वकील आहेत जे आपली वकिली संस्कृतमधूनच करतात. विशेष म्हणजे मोठेपणी वकील व्हायचं आणि सगळं काम संस्कृत भाषेतूनच करायचे हा निर्णय त्यांनी सातव्या इयत्तेत असतानाच घेतला होता. त्यांनी तो निर्णय अंमलातही आणला. सिंह 3 लाख, वाघ 3 लाख 10 हजार, हरिण 20 हजार! वन्य प्राणी मिळणार दत्तक गेल्या 42वर्षांपासून ते लेखी कामकाजासह न्यायालयात केल्या जाणाऱ्या सुनावणीपर्यंत सर्व वकिली काम संस्कृतमध्ये करत आहेत. आपल्या वडिलांमुळे आपल्याला संस्कृतची गोडी लागल्याचं ते सांगतात. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा श्याम उपाध्याय संस्कृतमध्ये लिहिलेले कागदपत्र न्यायाधीशांसमोर मांडायचे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे. आजही वाराणसीत एखादे नवे न्यायाधीश आले की उपाध्याय यांच्या संस्कृत भाषेतील कामकाजामुळे आश्चर्यचकीत होतात. प्रेमासाठी वाट्टेल ते! मलायका अरोराच्या प्रेमात अर्जुन कपूरने उधळले 23 कोटी रु. केवळ भाषाच नाही तर आपल्या दिसण्यातूनही श्याम उपाध्याय यांनी आपलं वेगळेपण जपलं आहे. ते नेहमी काळा कोट घालतात तसंच कपाळावर त्रिपुंड्र आणि टिळा लावतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि वागणूक दोन्हीही अतिशय मार्दवपूर्ण आहे. त्यामुळं त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते अगदी सहजपणे संस्कृत भाषेत खटला समजावून सांगतात. भारताच्या समृद्ध प्राचीन वारश्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या संस्कृत भाषेचं जतन करण्याच्या ध्येयानं झपाटून वकिलीसारखा पेशाही संस्कृतमधून चालवण्याचा वसा निभावणारे आचार्य श्याम उपाध्याय यांच्यासारख्या लोकांमुळेच आजच्या आधुनिक काळातही ही भाषा अजूनही टिकून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.