मुंबई, 27 जुलै : चित्रपट अभिनेत्री आणि अभिनेता एकत्र फिरणं किंवा त्यांच्या रिलेशन असणं ही काही आता नवी बाब राहिलेली नाही. भारतीय चित्रपटसृष्टी सुरू झाल्यापासून नट-नट्यांच्या अनेक प्रेम कहाण्या जगाने पाहिल्या आहेत. त्या प्रेम कहाण्यांमध्ये जग काय म्हणतं याला अजिबात किंमत नसते. त्यामुळे ते बिनधास्त असतात. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मलायका अरोराच्या (Malaika arora) प्रेम कहाणीचे किस्से सतत ऐकायला मिळत असतात. बऱ्याच दिवसांपासून दोघे रिलेशनशिप आहेत. अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागलेली आहे. त्यातच त्यांनी इतर सेलेब्रिटीप्रमाणे आपलं नातं लपवून सुद्धा ठेवलेलं नाही. अलीकडे अर्जुन कपूर आपल्या चित्रपटांपेक्षा मलायकाशी असलेल्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतो. दोघेही बऱ्याचदा पार्टी फंक्शन्स (Party Functions) आणि व्हेकेशनवर (Vacation) एकत्र दिसतात. एकत्र वाढदिवस देखील साजरे करतात. सध्या या दोघांबाबत नवीन माहिती सामोर आली आहे. अर्जुन कपूर मलायकासोबत प्रेमात एवढा गुंतला आहे की त्यानं चक्क आता मलायकाच्या घराजवळच सी-फेसिंग व्हिला (Villa) खरेदी केला आहे. अर्जुन कपूरने 4 बीएचके (BHK) सी- फेसिंग (Sea- Facing) घर खरेदी केलं आहे. हे घर वांद्र्यामध्ये मलायकाच्या घराजवळच आहे. 26 व्या मजल्यावर असलेल्या या घराची किंमत 20 ते 23 कोटी रुपयांदरम्यान आहे. हे वाचा - ग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नेक ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क मलायकासाठी अर्जुन कपूरने एवढे महागडे घर खरेदी केल्याने त्यांच्या नात्याबद्दल अजूनच उत्सुकता वाढली आहे. दोघांची संपत्ती सुद्धा अमाप आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 188 कोटी रुपये आहे. मलायका अरोराची संपत्ती 100 कोटी रुपये आहे तर अर्जुन कपूरची 88 कोटी असावी असा अंदाज आहे. अर्जुन कपूरची संपत्ती अंदाज 10 कोटी डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं. ही आकडेवारी दिसत असली तरीही प्रत्यक्ष संपत्ती किती आहे हे सांगता येत नाही हे केवळ अंदाज आहेत. यानुसार एका महिन्याची कमाई 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर वर्षाची कमाई 8-10 कोटींपेक्षा जास्त आहे. अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी सुमारे 5 ते 7 कोटी रुपये घेतो. ब्रँड एंडोर्समेंटची (Brand Endorsement) फी 1 कोटी रुपये असते. अर्जुन कपूर गाड्यांचा सुद्धा मोठा चाहता आहे. त्याच्याकडे एकापेक्षा जास्त लक्झरी कार आहेत. यामध्ये मर्सिडीज (Mercedes) आणि ऑडी (Audi) अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. अर्जुनकडे मर्सिडीज ML350, ऑडी Q5, लँड रोव्हर डिफेंडर, होंडा CRV या ब्रँडच्या सुंदर गाड्या आहेत. हे वाचा - ..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू अर्जुन कपूरने मलायकाच्या प्रेमामध्ये महागडे घर घेऊन एक प्रकारे त्यांच्या प्रेमाची कबुलीच दिली आहे. आता दोघंही जवळ राहायला आले असले तरी एकाच घरात एकत्र कधी राहतात, याची मात्र त्यांच्या चाहत्यांना जास्त उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.