Home /News /mumbai /

सिंह 3 लाख, वाघ 3 लाख 10 हजार, हरिण 20 हजार! बोरिवली अभयारण्यातले प्राणी दत्तक घेता येणार

सिंह 3 लाख, वाघ 3 लाख 10 हजार, हरिण 20 हजार! बोरिवली अभयारण्यातले प्राणी दत्तक घेता येणार

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या, असं आवाहन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांनी केलं आहे. वन्य जीव संवर्धनास मदत करण्यासाठी वाघ सिंहांसह नीलगाय, चितळही एकेका वर्षासाठी दत्तक घेता येतील. काय आहे नेमकी योजना?

मुंबई, 27 जुलै: कुत्र्या-मांजरासारखे पाळीव प्राणी नव्हे तर वन्य प्राणी दत्तक घेता येणार आहेत. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानेच (Borivali national park) वन्य प्राणी दत्तक (wild animals for Adoption) द्यायची योजना केली आहे. त्यासाठी दरही ठरवण्यात आले आहेत. वाघ, सिंह एका वर्षासाठी आता तुम्हालाही दत्तक घेता येतील. अर्थात हे दत्तक घेणं म्हणजे वन्य प्राण्यांना स्वतःच्या घरी घेऊन जाणं नाही बरं का. या वन्य प्राण्यांच्या देखभालीचा खर्च उचलण्याची ही योजना आहे. राष्ट्रीय उद्यानात असलेल्या वन्य प्राण्यांच्या देखभालीचा खर्च मोठा आहे. एका वाघासाठी वर्षभरात काही लाख रुपये खर्च येतो. तो उचलणं हाच त्यात भाग आहे. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल बोरिवलीच्या (Borivali) नॅशनल पार्कात केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वनं आणि वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळेल. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना 1 वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावं, असं आवाहन वनसंरक्षक आणि संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केलं आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षासाठी आहे. असे आहेत दर वाघ रुपये ३,१०,००० सिंह रुपये ३,००,००० बिबट रुपये १,२०,००० वाघाटी रुपये ५०,००० नीलगाय रुपये ३०,००० चितळ रुपये २०,००० भेकर रुपये १०,००० पुण्याच्या ब्रॅंडनं केली कमाल! गायींच्या दुधाच्या ब्रँडचं उत्पन्न कोरोनात दुप्पट याविषयीची अधिक माहिती बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात मिळू शकेल.
First published:

Tags: National park, Tiger

पुढील बातम्या