जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा

फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा

 पुण्यात  सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयानं (Ministry of Home Affairs) कोरोनासंबंधित नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जानेवारी : देशात गेल्या चार महिन्यांत कोरोनाची (coronavirus) नवीन प्रकरणं कमी झाली आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे.  ही परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्रालयानं (Ministry of Home Affairs) कोरोनासंबंधित नवीन मार्गदर्शक सूचना जारी (corona news guidelines) केल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं (MHA) कोरोनासंबंधित नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यांअंतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासाला बंदी नाही. व्यक्तींनाही प्रवास करता येईल. शिवाय सामानाचीही वाहतूक करता येईल. सीमा पार करून शेजारील देशांमध्येही प्रवास करण्याची मुभा आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation) आणि केंद्रीय गृहमंत्रालय परिस्थिती पाहून आंतराराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा सुरू करायची ही नाही याबाबत निर्णय घेईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हे वाचा - मास्क वापरणं Must! कोरोनाच्या प्रसाराबाबतच्या अभ्यासातून समोर आलेलं कारण वाचा तरीदेखील आवश्यक ती काळजी घेण्याची आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तसंच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक कार्यक्रमांना हॉलमध्ये 50 टक्के लोकांसह आणि खुल्या भागात  200  व्यक्तींची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. पण याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही राज्यांना सोपवण्यात आला आहे. हे वाचा -  कोरोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय तसंच 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, आजारी, प्रेग्नंट महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणिआरोग्य सेतू अॅपचाही वापर करावा असा सल्लाही केंद्रीय गृहमंत्रालयानं दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात