मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मास्क वापरणं Must! फक्त शिंक किंवा खोकल्यातून नव्हे तर संसर्गित व्यक्तीच्या बोलण्यातूनही पसरू शकतो कोरोना

मास्क वापरणं Must! फक्त शिंक किंवा खोकल्यातून नव्हे तर संसर्गित व्यक्तीच्या बोलण्यातूनही पसरू शकतो कोरोना

Covid19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून (Coughing) किंवा शिंकेतून (Sneezing) विषाणू पसरण्याचा जितका धोका आहे, तितकाच धोका त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही (Talking) आहे.

Covid19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून (Coughing) किंवा शिंकेतून (Sneezing) विषाणू पसरण्याचा जितका धोका आहे, तितकाच धोका त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही (Talking) आहे.

Covid19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून (Coughing) किंवा शिंकेतून (Sneezing) विषाणू पसरण्याचा जितका धोका आहे, तितकाच धोका त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही (Talking) आहे.

नवी दिल्ली, 25 जानेवारी:  सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क (Mask) घालणं महत्त्वाचं आहे; पण तरीही ते अनेकांना पटत नाही. आता मात्र ते का महत्त्वाचं आहे याचं आणखी एक कारण अधिकृतरीत्या पुढे आलं आहे. कोविड-19चा (Covid19) संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून (Coughing) किंवा शिंकेतून (Sneezing) विषाणू पसरण्याचा जितका धोका आहे, तितकाच धोका त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही (Talking) आहे. दी रॉयल सोसायटी जर्नलमध्ये नुकताच एका अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर झाला आहे. 'इव्हॉल्युशन ऑफ स्प्रे अँड एअरोसोल फ्रॉम रेस्पिरेटरी रिलिजेस : थिअरॉटिकल एस्टिमेट्स फॉर इन्साइट्स ऑन व्हायरल ट्रान्स्मिशन' असं या अभ्यासाचं नाव आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दोन मीटर अंतरात मास्कशिवाय राहणं धोकादायक असल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. या अंतरावरचा संसर्ग झालेल्या मनुष्य मास्क न लावता बोलत असेल, तर त्यातूनही संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. खोकताना स्रावाचे मोठे थेंब (Particles) बाहेर पडतात. ते कमी अंतरावर पडतात; मात्र बोलताना बाहेर उडणारे थेंब आकाराने त्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे ते वातावरणात जास्त काळ राहू शकतात, तसंच जास्त अंतरावरही जाऊ शकतात. दोन मीटरपेक्षा जास्त अंतर पार करण्यासाठी या थेंबांना काही सेकंदं पुरतात, असंही या अभ्यासातून दिसून आलं आहे. तसंच, पुरेशी हवा खेळती नसलेल्या ठिकाणी (Poor Ventilation) असल्यास कोविडचा संसर्ग न पसरण्यासाठी केवळ शारीरिक अंतर पुरेसं नाही, असंही या अभ्यासातून स्पष्ट झालं   आहे. केम्ब्रिज विद्यापीठातील फ्लुइड मेकॅनिक्स विषयातील तज्ज्ञ प्रा. पेड्रो मागल्हाइस डे ओलिव्हेरा यांनी 'गार्डियन'ला सांगितलं, की 'तुम्ही मास्क घालणं आवश्यक आहे, शारीरिक अंतर पाळणं आवश्यक आहे, तसंच पुरेशी हवा खेळती राहणंही आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गित व्यक्तीच्या तोंडातून आलेले थेंब बंदिस्त खोलीत साठून राहणार नाहीत.' प्रा. पेड्रो यांच्या नेतृत्वाखालीच हा अभ्यास करण्यात आला. 'बोलणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण खोकल्याच्या तुलनेत बोलताना तोंडातून बाहेर येणारे थेंब खूप लहान असतात. हे थेंब किंवा एअरोसोल्स आजूबाजूच्या वातावरणात काही तास तरंगत राहू शकतात आणि रोगप्रसार करण्यासाठी पुरेसे ठरू शकतात,' असंही प्रा. पेड्रो यांनी सांगितलं. 'आजूबाजूच्या लोकांच्या श्वासातून किती प्रमाणात हे एअरोसोल्स शरीरात गेले आहेत, त्या व्यक्तींमधलं अंतर किती आहे, त्यांनी मास्क घातले आहेत, ते घराबाहेर आहेत की बंदिस्त खोलीत, खोलीत असले तर खोलीत हवा खेळती राहते का, अशा अनेक गोष्टींवर संसर्ग होणं - न होणं अवलंबून आहे,' असंही प्रा. पेड्रो यांनी स्पष्ट केलं. airborne.com हा एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरही (Online Calculator) या टीमने तयार केला आहे. घरातल्या घरात हवेतल्या थेंबांद्वारे संसर्ग होण्याचा धोका किती आहे, हे याद्वारे शोधता येऊ शकतं. यात खोलीची लांबी आणि उंची, व्यक्ती किती काळ एका खोलीत होत्या, खोलीत हवा खेळती राहण्याचं प्रमाण किती होतं, परिधान केलेल्या मास्कचे प्रकार आणि खोलीत नेमकं काय केलं जात होतं, या माहितीच्या आधारे संसर्गाच्या धोक्याचा अंदाज लावता येतो. या ऑनलाइन कॅल्क्युलेटरची मदत दुकानं, वर्गखोल्या, कार्यालयं अशा ठिकाणी घेता येऊ शकते. तसंच, संसर्ग रोखण्यासाठी व्हेंटिलेशन पुरेसं आहे का, याचाही अंदाज बांधता येतो.
First published:

Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या