बाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय करायचा हाच प्रश्न पडला

बाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय करायचा हाच प्रश्न पडला

ghlynnyl hylhyr yzzyghyl हे नाव तुम्ही उच्चारू शकता का?

  • Share this:

मनिला, 08 मे : जगप्रसिद्ध लेखक, नाटककार शेक्सपिअरनं म्हटलं आहे की, नावात (Name) काय आहे? पण तरीही आपल्या बाळाचं नाव (Baby name) ठेवताना ते आगळंवेगळं,अर्थपूर्ण, छान असावं असा प्रयत्न सगळेच आई-वडील करत असतात. यातूनच काही जगावेगळी विचित्र नावं ठेवली आहेत. जगप्रसिद्ध टेस्ला कार कंपनीचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या मुलाचं नाव अगदी जगावेगळं ठेवलं. एलन मस्क यांच्या मुलाचा गेल्या वर्षी मे महिन्यात जन्म झाला. त्याचं नाव त्यांनी ठेवलं आहे ‘एक्स ए ई -12’(X A E -12). त्यावरून जगभरात आजही चर्चा सुरू असतानाच आणखी एका जगावेगळ्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. फिलिपिन्समधील (Philippines) एका बाळाचं नाव असं ठेवण्यात आलं आहे की त्यात एकही स्वर नाही, तसंच हे नाव लिहिणं आणि उच्चारणं तर अतिशय कठीण आहे. नाव उच्चारताना आपली जीभ वळेल असं हे कठीण नाव आहे.

फिलिपिन्समधील (Philippines) नॉर्थ कोटाबाटो इथल्या कार्मेनमधील एका कुटुंबानं आपल्या मुलाचे नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl M. Buscato असं ठेवलं आहे. हे नाव लिहायला आणि उच्चारायला देखील अतिशय कठीण असून, यात एकही स्वर नाही. 27 एप्रिल रोजी जन्मलेल्या या बाळाचं हे अतिशय कठीण नाव त्याचे आजोबा रागिल फेरोलिन एस्ट्रेरा यांनी ठेवलं आहे.

29 एप्रिल रोजी या बाळाच्या जन्म प्रमाणपत्राचे छायाचित्र या कुटुंबाचे मित्र युलेसेस रोम्नेक सेक्विना रेफरेन्टे यांनी फेसबुकवर शेअर केलं आणि या जगावेगळ्या नावानं सगळीकडे धूम माजवली. Glhynnyl Hylhyr Yzzyghyl M. Buscato तुझं या जगात स्वागत आहे, अशी कॅप्शन असलेली ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आणि त्यावर कमेंटही आल्या आहेत.

हे वाचा - चिमुरड्यांचंही बनवा Aadhar Card! 5 वर्षाखालील मुलांचं आधार बनवण्याची प्रक्रिया

नेटिझन्सनी हे आव्हानात्मक नाव अचूकपणे वाचण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यावर मजेदार कमेंटस केल्या. एका व्यक्तीनं मजेत असं म्हटलं आहे की, हा मुलगा मोठा होईपर्यंत वाट पाहिल आणि तो आपलं नाव हेच ठेवतो का हे बघेल. दुसर्‍या एका व्यक्तीनं लिहिलं आहे की, तो त्या बाळाच्या जागी असता तर त्यानं त्याचे आई-वडील बदलले असते. एकानं तर असं म्हटलं आहे की, असं नाव असण्यापेक्षा नसलेलं चांगलं. अनेक लोकांनी या विचित्र नावाबद्दल आश्चर्य आणि मजा वाटत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर काहींनी या बाळाला पुढे शाळेत त्याचं नाव लिहिताना किती त्रास होईल, याबद्दल चिंता व्यक्त केली.

हे वाचा - VIDEO : मला लग्न करायचं आहे! भलताच हट्ट करत बाबासमोर ढसाढसा रडली चिमुकली लेक

दरम्यान या बाळाच्या आजोबांनी जीएमए नेटवर्कशी बोलताना सांगितलं की, त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र पुन्हा छापणं आवश्यक आहे. कारण कागदोपत्री नाव नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यानं त्याचं नाव लिहिताना स्पेलिंग चुकीचं लिहिलं आहे. या आजोबांनी बाळाला ‘कॉन्सोनंट’ म्हणजे मुळाक्षरे (Consonant) असं टोपण नाव दिलं आहे.कारण या नावामध्ये कोणताही स्वर नाही. त्यांनी या नावामागचा हेतू आणि कारण सांगितलं. बाळाचं हे नाव त्यांचं स्वतःचं नाव, बाळाच्या आई-वडीलांचं नाव आणि बाळाच्या आजीचं नाव या सगळ्यांमधील अक्षरं घेऊन तयार करण्यात आलेलं  आहे. हे बाळ या कुटुंबातील एकमेव असं बाळ आहे ज्याच्या नावात एकही स्वर नाही, असा दावा त्याचे वडील लिहिर लॉन यांनी केला आहे.

First published: May 8, 2021, 7:47 AM IST

ताज्या बातम्या