मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! जन्मतःच गोंडस बाळ झालं म्हातारं; चिमुकल्या लेकीचं रूप पाहून आईसुद्धा शॉक

OMG! जन्मतःच गोंडस बाळ झालं म्हातारं; चिमुकल्या लेकीचं रूप पाहून आईसुद्धा शॉक

  • Published by:  Priya Lad

केपटाऊन, 03 सप्टेंबर : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. तिने नऊ महिने त्याला पोटात वाढवलेलं असतं. तेव्हापासून ती त्याच्याशी जोडली जाते आणि त्याच्याबाबत बरीच स्वप्नं रंगवते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी ती उत्सुक असते. तसं मूल कसंही असलं तरी ते तिच्यासाठी प्रिय असतं. पण जन्मानंतरच गोंडस दिसणारं तिचं बाळ अचानक म्हातारं दिसू लागलं (Child look older) तर तिची काय अवस्था होईल?

दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) एका महिलेसोबत असं झालं आहे. तिची चिमुकली लेक जन्मानंतरच अगदी वयस्कर महिलेप्रमाणे दिसू लागली  (Newborn With 60 Year Look). आपल्या या चिमुरडीचं रूप पाहून तीसुद्धा घाबरली.

दक्षिण आफ्रिकेतील मीडियाच्या माहितीनुसार इस्टर्न केपमधील लिबादेमध्ये राहणाऱ्या 20 वर्षांच्या महिलेला 30 ऑगस्ट प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही त्यामुळे घरीच तिची प्रसूती झाली.तिने एका मुलीला जन्म दिला. पण मुलीला जन्मानंतर पाहताच धक्काच बसला.

हे वाचा - फणफणून ताप, प्लेटलेट्स घटल्या आणि रक्तस्राव; चिमुकल्यांचा जीव घेतोय भयंकर आजार

ती खूप विचित्र दिसत होती. म्हणजे वयस्कर वयक्तींच्या त्वचेवर जशा सुरकुत्या असतात अगदी ती तशीच दिसत होती.  त्यानंतर आई आणि बाळ दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं मग त्या मुलीला दुर्मिळ आजार असल्याचं समजलं. तिला प्रोगेरिया (Progeria) आहे. ज्याला  Hutchinson-Gilford सिंड्रोमसुद्धा म्हटलं जातं. हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारात अगदी कमी वयात व्यक्ती जास्त वयाची दिसू लागते. या आजारामुळे ही मुलगी हालचाल करू शकत नव्हती, अगदी रडतही नव्हती.

हे वाचा - चिमुकल्याच्या पांढऱ्या केसांनी वाढवलं टेन्शन! का येतंय बालवयातच म्हातारपण?

मायो क्लिनिकच्या डॉक्टरांच्या मते, यामध्ये लहान मुलांचं वय विशेषतः सुरुवातीच्या दोन वर्षांत झपाट्याने वाढतं. याचवेळी आठ वर्षांची दिसू लागतात. 20 वर्षांपर्यंतच्या लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. बहुतेक प्रकरणांत लहान मुलांमध्ये हा आजार एक वर्षापर्यंत लपून राहतो त्यानंतर ते अचानक म्हातारे दिसू लागतात.

First published:

Tags: Health, Lifestyle, Parents and child, Rare disease