Home /News /lifestyle /

चिमुकल्याच्या पांढऱ्या केसांनी वाढवलं टेन्शन! का येतंय बालवयातच म्हातारपण?

चिमुकल्याच्या पांढऱ्या केसांनी वाढवलं टेन्शन! का येतंय बालवयातच म्हातारपण?

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

लहान मुलांचे केस पांढरे होण्याची कारणं आणि उपाय.

मुंबई, 02 सप्टेंबर : आपल्याकडे एखादी वयोवृद्ध व्यक्ती आपला अनुभव सांगण्यासाठी तिच्या पांढऱ्या केसांचा (White hair) दाखला देते. ‘हे केस काय उगाच पांढरे (Grey hair) नाही झालेयत’ हा तर त्यांचा ठरलेला डायलॉग असतो; मात्र आजकाल या डायलॉगमधली परिस्थिती केवळ वृद्ध व्यक्तींपुरती मर्यादित राहिली नसून, लहान मुलंही असं म्हणू (White hair problem in children) शकतात. याला कारण म्हणजे लहान वयातच या मुलांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. लहान वयातच केस पांढरे होण्यासाठी (Kids white hair) काही गोष्टी कारणीभूत ठरतात. यामध्ये शरीरात मेलॅनिनची निर्मिती बंद होणं, शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असणं, व्हिटॅमिन बीची कमतरता (Early age whitening of hair) असणं अशा काही कारणांचा समावेश असतो. यासोबतच, एखाद्या ऑपरेशनमुळे, औषधांच्या दुष्परिणामामुळे, झोप न झाल्यामुळे किंवा तणावामुळेही केस लवकर पांढरे (Hair whitening reasons) होतात. कित्येक वेळा ही गोष्ट आनुवंशिकही असते. हे वाचा - पार्लरमधील वेदनादायी प्रक्रिया विसरा; अंड्यानेच Blackheads पासून मिळवा मुक्ती केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी काही घरगुती (Home remedies to avoid white hair) उपाय आहेत. यातला एक उपाय म्हणजे, आपल्या मुलांच्या आहारात आवळ्याचा समावेश करणं. यामुळे केसांसोबत डोळ्यांनाही फायदा होतो. दररोज एक किंवा दोन आवळे (Amla for hair) कच्चे खायला देऊ शकता किंवा मग आवळ्याची चटणी, लोणचं वा आवळा कँडी अशा पदार्थांचाही आहारात समावेश करू शकता. आवळा केवळ खाऊनच नाही, तर केसांना लावल्यामुळेही फायदा होतो. खोबरेल तेलामध्ये आवळा घालून, तो शिजवून (Amla paste to apply on hair) घ्यावा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड याने डोक्याला मालिश करू शकता. यासोबतच दुसरी एक पेस्ट तुम्ही आपल्या मुलांच्या केसांना लावू शकता. दही आणि टोमॅटोमध्ये लिंबू पिळून त्याची पेस्ट (Homemade pastes to apply on hair) तयार करावी. या पेस्टने आपल्या मुलांच्या डोक्याला मसाज करा. एक तासानंतर केस धुवून टाका. हे आठवड्यातून दोन वेळा करा. याव्यतिरिक्त रिठा, वाळवलेला आवळा आणि शिकेकाई (Home remedies for black and silky hair) रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. यासाठी लोखंडाची कढई वापरल्यास उत्तम. सकाळी या तीनही गोष्टी एकत्रित वाटून घ्या. यातून काळ्या रंगाची एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट केसांना एक तास लावून ठेवावी. नंतर केस धुवून टाकावेत. यामुळे केस काळे, दाट आणि मऊ होण्यास मदत होते. हे वाचा - चष्म्यापासून लवकर मुक्तता हवी; आहारात समाविष्ट करा फक्त हे 5 पदार्थ घोसाळ्याची भाजीदेखील केसांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते. ही भाजी खोबरेल तेलात उकळून घ्यावी. जेव्हा घोसाळं (Cure white hairs at early age) पूर्णपणे काळं होईल, तेव्हा उकळणं थांबवून हे मिश्रण थंड होऊ द्यावं. यानंतर ते घोसाळं एका तेलाच्या बाटलीत ठेवून द्यावं. त्याच तेलाने दररोज केसांना मालिश करावं. या सर्व उपायांव्यतिरिक्त, आहारात पालेभाज्यांचा, डाळींचा आणि कडधान्यांचा समावेश करणं आवश्यक (Diet to avoid white hair) आहे. तसंच मुलांना दररोज दुग्धजन्य पदार्थ आणि एक फळ खाण्यास देणंही गरजेचं आहे. यासोबत त्यांचा शारीरिक व्यायाम होईल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Parents and child, Woman hair

पुढील बातम्या