लखनऊ, 02 सप्टेंबर : एकिकडे कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा (Corona third wave) धोका लहान मुलांनाही (Children disease) आहे, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्याआधीच अशा एका भयंकर आजाराने थैमान घातलं (Children died because of fever) आहे, जो सर्वाधिक चिमुकल्यांना आपलं बळी (Children died in uttar pradesh) बनवतो आहे. त्यामुळे सरकारही हादरलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh) गेले काही दिवस तापाची प्रकरणं समोर येत आहे. तीव्र ताप असलेले बरेच रुग्ण समोर येत आहे. फणफणून ताप (Fever) आलेल्या रुग्णांचा काही दिवसांतच मृत्यू होतो आहे. फिरोजाबादमध्ये (Firozabad) अशी बहुतेक प्रकरणं आढळली आहेत. या आजाराचं खरं रूप समोर आलं आहे (Dengue fever).
A team of World Health Organization (WHO) told me that it is dengue hemorrhagic fever (DHF), a severe and sometimes fatal form of the disease which causes a sudden drop in platelet count & bleeding in gums: Firozabad District Magistrate Chandra Vijay Singh pic.twitter.com/HZscIZxzh5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 2, 2021
फिरोजाबादचे जिल्हाधिकारी चंद्र विजय सिंह यांनी सांगितलं, “जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने मला हा डेंग्यू हेमरोजेनिक फिव्हर असल्याचं सांगितलं आहे. हा गंभीर आणि जीवघेणा असा आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात आणि त्यानंतर रक्तस्रावही होतो” हे वाचा - …..तरच लोकांना एकत्र जमता येईल; सणासुदीच्या कालावधीत मोदी सरकारची मोठी घोषणा आग्रा विभागाचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. ए.के. सिंह यांनी सांगितलं, डेंग्यू आणि इतर संशयित आजारामुळे 36 लहान मुलं आणि 5 प्रौढांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी आयसीएमआरच्या टीमने नमुने घेतले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.