दिल्ली, 11 डिसेंबर: नवं वर्ष (New Year) अर्थात 2022 हे साल सुरू होण्यास आता अगदी जेमतेम काही दिवस बाकी राहिले आहेत. लवकरच आपण 2021 ला निरोप देणार आहोत. वर्षारंभ म्हटला, की प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो. गत वर्षातले बरे-वाईट अनुभव विसरत नव्या वर्षात वाटचाल करण्याचा निश्चयदेखील या निमित्ताने केला जातो. आगामी वर्ष आपल्याला कसं जाईल, असा प्रश्न स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या मनात असतो. काही जण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र (Jyotish Shastra) अभ्यासकांचा सल्ला घेतात. काही ज्योतिष अभ्यासक नव्या वर्षात शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, नोकरी किंवा व्यवसाय आदी क्षेत्रात कसे अनुभव अपेक्षित असतील, या अनुषंगाने काही गोष्टी सांगतात. वर्षभरातल्या ग्रहयोगांचा या गोष्टींवर परिणाम होत असल्यानं अशा अंदाजांना महत्त्व असतं. 2022 या आगामी वर्षाचा विचार करायचा झाला तर या वर्षाच्या सुरुवातीला कालसर्प योग (Kalsarpa Yog) येत आहे. त्यामुळे आगामी वर्षात मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. याबाबतची माहिती `आज तक`ने दिली आहे.
2022 ची सुरुवात कन्या (Virgo) लग्न आणि वृश्चिक (Scorpion) राशीत होत आहे. वर्षप्रारंभावेळी लग्न हस्त नक्षत्रातल्या पहिल्या चरणात आणि चंद्र ज्येष्ठ नक्षत्रातल्या पहिल्या चरणात असेल. ही ग्रह स्थिती पाहता आगामी वर्ष कामगार आणि बुद्धिजीवी व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. नशिबाच्या भरवशावर बसणाऱ्यांच्या पदरी निराशा पडेल. वर्षाच्या सुरुवातीला कालसर्प योग येत असल्यानं मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं ज्योतिषाचार्य कमलनंद लाल यांनी सांगितलं.
2022 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगलं असेल. कोरोनामुळे ज्या क्षेत्रांना फटका बसला, त्या क्षेत्रांना आगामी वर्षात दिलासा मिळू शकतो. याचाच अर्थ एकूण स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
10, 16 डिसेंबरला मोठे ग्रह बदलणार राशी; या लोकांसाठी आश्चर्यकारक बदल दिसतील
2022 हे वर्ष शैक्षणिक (Education) आणि आरोग्यदृष्ट्या (Health) संमिश्र असेल. शिक्षणाचा विचार करता येत्या वर्षात विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. 2021मध्ये कोरोनामुळे (Corona) विस्कटलेली शिक्षण क्षेत्राची घडी आगामी वर्षात सुरळीत होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या आगामी वर्ष सर्वसाधारण राहील. तथापि, मुलांना आजार होऊ नयेत, यासाठी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.
2022च्या सुरुवातीला रात्री 12 वाजता कालसर्प योग येत आहे. त्यात राहूचं मुख भाग्य स्थानात आहे. केतू चंद्र आणि मंगळासोबत पराक्रम स्थानात आहे. त्यामुळे जगभरात खूप चिंताजनक स्थिती निर्माण होईल. एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. आकाशातून एखादी आपत्ती (Disaster) येऊ शकते.
क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट
मुसळधार पाऊस, पूर यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. भूकंप किंवा त्सुनामीचेही संकेत आहेत, असं ज्योतिषाचार्य कमलनंद लाल यांनी सांगितलं.
(Disclaimer: या लेखातला मजकूर सर्वसामान्यपणे उपलब्ध ज्योतिषशास्त्र विषयक माहितीवर आधारित आहे. News18lokmat याची पुष्टी करेलच असं नाही. कुठल्याही अंधश्रद्धेला चालना देण्याचा इथे उद्देश नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.