मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

10 आणि 16 डिसेंबरला मोठ्या ग्रहांचे परिवर्तन; या राशींच्या लोकांना दिसतील आश्चर्यकारक बदल

10 आणि 16 डिसेंबरला मोठ्या ग्रहांचे परिवर्तन; या राशींच्या लोकांना दिसतील आश्चर्यकारक बदल

10 डिसेंबरला बुध आणि 16 डिसेंबरला सूर्य ग्रहाच्या स्थानामध्ये परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल पहायला मिळण्याची शक्यता (Rashibhavishya) आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर : या महिन्याच्या 5 डिसेंबरला मंगळ ग्रहाच्या आणि आठ डिसेंबरला झालेल्या शुक्राच्या परिवर्तनानंतर 10 डिसेंबरला बुध आणि 16 डिसेंबरला सूर्य ग्रहाच्या स्थानामध्ये परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल पहायला मिळण्याची शक्यता (Rashibhavishya) आहे.

या राशींच्या लोकांचं नशीब उघडणार

मेष - गुरू ग्रह तुमच्या राशीच्या लाभस्थानी म्हणजे एकादश स्थानी आहे. जर तुम्ही नोकरीत किंवा व्यवसायात असाल तर, त्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. बहीण-भावांचं सहकार्य मिळेल. करिअरच्या दृष्टीनं हा महिना शुभ आहे.

मिथुन - गुरू तुमच्या राशीच्या नवम स्थानी आहे. तुम्हाला भाग्य आणि कुटुंबाची भरपूर साथ मिळेल आणि अनेक अडलेली कामं पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास निश्चितपणे यश मिळेल. धार्मिक कार्यं वाढतील. खासगी जीवन आणि कार्यक्षेत्रातील परिस्थिती तुमच्या पक्षात राहील. प्रवासाचा योग आहे. पैशाचं येणं वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह- गुरू तुमच्या राशीच्या सप्तम स्थानी आहे. हे स्थान जीवन साथी आणि भागीदारीसाठीचं स्थान आहे. याचा अर्थ दाम्पत्य जीवनात आनंद निर्माण होईल आणि जर भागीदारीत कोणता व्यापार करत असाल तर त्यातही लाभ मिळेल, असा आहे.

हे वाचा - वारंवार होणाऱ्या डोकेदुखीनं त्रस्त आहात का? हे 5 आयुर्वेदिक उपाय करून पहा परिणाम

धनु - गुरू तुमच्या राशीच्या तिसऱ्या स्थानी आहे. ही बाब तुमच्यासाठी भाग्याची आहे. तुम्हाला आणखी चांगलं काम करून दाखवण्याची गरज आहे. मेहनतीचं फळ मिळेल. विवाह आणि प्रवासाचे योग आहेत. बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आळस सोडून आपल्या स्वप्नांसाठी आणि ध्येयासाठी प्रयत्न सुरू करा. कारण, ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन सुखद राहील. नवीन व्यापार सुरू करण्याचे ठरवत असाल तर हा महिना चांगला आहे.

हे वाचा - दिवसातील या वेळात कोरोना लस घेणं आहे अधिक प्रभावी; नवीन संशोधनातील निष्कर्ष

कुंभ - गुरू तुमच्या राशीच्या पहिल्या स्थानी येईल. जर तुम्ही कोणासोबत भागीदारीत काम करत असाल तर, त्यामध्ये फायदा मिळेल. नोकरी बदल शहर आणि नवीन व्यवसायात पैसा गुंतवणूक यासाठी हा चांगला काळ आहे. मेहनतीनुसार चांगलं फळ मिळेल. धनलाभ होईल आणि याआधी केलेल्या गुंतवणुकीत लाभ मिळेल.

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark