मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बापरे! कोरोनानंतर अंदमानमध्ये पसरतोय हा महाभयंकर सुपरबग; कोणत्याच औषधाला देत नाही दाद

बापरे! कोरोनानंतर अंदमानमध्ये पसरतोय हा महाभयंकर सुपरबग; कोणत्याच औषधाला देत नाही दाद

हा सुपरबग पसरला तर महासाथीचं रूप घेऊ शकतो. त्यामुळे अंदमानमध्ये चिंतेचं वातावरण आहे

हा सुपरबग पसरला तर महासाथीचं रूप घेऊ शकतो. त्यामुळे अंदमानमध्ये चिंतेचं वातावरण आहे

हा सुपरबग पसरला तर महासाथीचं रूप घेऊ शकतो. त्यामुळे अंदमानमध्ये चिंतेचं वातावरण आहे

नवी दिल्ली, 19 मार्च : भारतात आधीच कोरोनाव्हायरसने (coronavirus) धुमाकूळ घातला आहेत. त्यात आता नवं संकट येऊन ठेपलं आहे. कोरोनाव्हायरसनंतर आता आणखी एक महाभयंकर असा सुपरबग (superbug) सापडला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर शास्त्रज्ञांना हा सुपरबग आढळून आला आहे. हा सुपरबग जीवघेणा तर आहेच. पण तो मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याच औषधांचा परिणाम होत नाही.

कँडिडा ऑरिस असं या सुपरबगचं नाव आहे. 2009 साली जपानंमधील एका रुग्णामध्ये हा सुपरबग सापडला होता. त्यानंतर तो जगभर पसरला. बाल्टीमोरमधील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांनी या सुपरबगचा शोध लावला. ज्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. हा सुपरबग नेमका कुठून आला हे अद्याप काही समजलेलं नाही, असं संशोधक डॉ. अर्टुरो कासाडेवाल यांनी सांगितलं.

हे वाचा - 'कृपया कोरोना लस वाया घालवू नका', पंतप्रधान मोदींची कळकळीची विनंती

आज तकच्या रिपोर्टनुसार याच अभ्यासाच्या आधारे दिल्ली युनिव्हर्सिटीतील मेडिकल माइकोलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौधरी आणि त्यांच्या टीमने अंदमान बेटाजवळील बेटे आणि भारत-म्यानमार यांच्यादरम्यानच्या बेटावरील आठ वेगवेगळ्या ठिकाणावरील माती आणि पाण्याची तपासणी केली. वेटलँड जिथं माणसं जात नाहीत, तिथं औषधांना दाद देणारा तर सामान्य  समुद्रकिनाऱ्यावर औषधांना दाद न देणारा कँडिडा ऑरिस  मोठ्या प्रमाणात दिसून आला.  या भागात हे सुपरबग इथेच निर्माण झालेत की मानवांमार्फत आले हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हा एक फंगस आहे. सेटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, कँडिडा ऑरिसमुळे रक्तासंबंधी गंभीर संसर्ग होऊ शकतो. यावर उपचार करणं कठीण आहे. कारण यावर कोणत्याच अँटिफंगल औषधांचा परिणाम होत नाही. कोरोनाव्हायरसप्रमाणेच तो एकाच ठिकाणी दीर्घकाळ टिकाव धरू शकतो.

हे वाचा - सुंदर दिसण्याच्या नादात सडलं नाक; टीव्ही स्टारला कॉस्मेटिक सर्जरी पडली महागात

वातावरण बदलामुळे तापमान वाढलं आहे आणि त्यामुळे या सुपरबगची तग धरण्याची क्षमता वाढली आहे. अधिक तापमान असलेल्या भागात तो दिसून येत आहे. मानवी शरीरातही हा सुपरबग टिकाव धरतो कारण तिथं त्यांच्यासाठी आवश्यक असं तापमान असतं. माणसांमध्ये प्रवेश करण्याची क्षमता या सुपरबगमध्ये आली आहे, त्यामुळे तो खतरनाक ठरू शकतो, असा इशारा डॉ. कासाडेवाल यांनी दिला.

याआधीदेखील अनेक ठिकाणी हा सुपरबग सापडला होता तेव्हा यावर लस तयार करून त्याचा उंदरावर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. पण अद्याप या लशीची मानवी चाचणी झालेली नाही.  दरम्यान हा सुपरबग पसरला तर महासाथीचं रूप घेऊ शकतो. यावर त्यामुळे त्यावर औषध निर्माण करण्यासाठी आतापासून प्रयत्न करायला हवेत, असं मतही शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Health, Serious diseases, Wellness