मॉस्को, 17 मार्च : आपण सुंदर (beautiful) दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यातही ती महिला सेलिब्रिटी असेल तर मग काय आपल्या सौंदर्याची ती जास्तच काळजी घेते. आपल्या चेहऱ्यावर काही पिंपल्स, डाग असतील तर ते मेकअप करून झाकता येतात. शिवाय आता नाक, ओठ आपल्याला हव्या त्या आकारात करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचाही (cosmetic surgery) पर्याय उपलब्ध आहे. पण अनेकदा अशी सर्जरी फसते आणि मग सुंदर दिसण्याच्या नादात चेहरा कुरूप दिसू लागतो. अशीच कॉस्मेटिक सर्जरी करणं एका रिअॅलिटी टीव्ही स्टारलाही (reality tv star) चांगलंच महागात पडलं आहे. तिचं नाक अक्षरश: सडू (nose decaying) लागलं आहे.
रशियातील रिअॅलिटी टीव्ही स्टार एनास्तसिया बलिंस्कया (Anastasia Balinskaya). जिने अधिक सुंदर दिसण्यासाठी नाकाची कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वीच तिनं कॉस्मेटिक सर्जरी केलीसुद्धा. पण त्याचे गंभीर दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. तिच्या नाकाची अक्षरश: वाट लागली आहे. तिचं नाक सडू लागलं आहे.
एनास्तसियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतः याबाबत माहिती दिली आहे. तिने आपले काही फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.
हे वाचा - या गोंडस फोटोमागे दडलाय ड्रामा क्वीनचा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?
डेली मेलच्या रिपोर्टनुसार एनास्तसियाने सांगितलं, तिने काही वर्षांपूर्वी कॉस्मेटिक सर्जरी केली होती. पण आता तिच्या नाकात सूज आली आहे. सर्जरीत झालेल्या गडबडीमुळेच तिला समस्या उद्भवू लागली आहे. तिला आता पुन्हा सर्जरी करावी लागणार आहे. तिच्याकडे फक्त एक-दोन महिनेच आहेत. या कालावधीत जर सर्जरी नाही झाली तर तिचं नाक पूर्णपणे सडेल.
हे वाचा - एकुलता एक म्हणून वाढला, 2 दिवसांतच मिळाली 30 भावंडं; काय आहे प्रकरण?
दरम्यान एनास्तसियाने सर्जरीसाठी आर्थिक मदतही मागितली आहे. तिच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत आणि काही कारणांमुळे ती कर्जदेखील घेऊ शकत नाही. त्यामुळे तिनं आपल्या उपचारासाठी सर्वांसमोर हात पसरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health, Lifestyle, Operation, Star celebraties, Surgery, Wellness