जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शतायुषी भव! 100 काय तुम्ही 120 वर्षांपेक्षाही जास्त जगू शकणार; भारतीय शास्त्रज्ञाला सापडला दीर्घायुष्याचा फॉर्म्युला

शतायुषी भव! 100 काय तुम्ही 120 वर्षांपेक्षाही जास्त जगू शकणार; भारतीय शास्त्रज्ञाला सापडला दीर्घायुष्याचा फॉर्म्युला

शतायुषी भव! 100 काय तुम्ही 120 वर्षांपेक्षाही जास्त जगू शकणार; भारतीय शास्त्रज्ञाला सापडला दीर्घायुष्याचा फॉर्म्युला

शास्त्रज्ञांनी लावलेल्या एका शोधामुळे दीर्घ आयुष्य जगण्याचं माणसांचं स्वप्न लवकर पूर्ण होणार.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    लंडन, 28 सप्टेंबर : प्रत्येकाला निरोगी (Healthy life) आणि दीर्घ आयुष्य (Longer life) जगण्याची इच्छा असते; पण आजकालची जीवनशैली पाहता कमी वयात अनेक आजार जडलेले आपण पाहतो. अगदी तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. वयाच्या साठीनंतरचं आयुष्य बोनसच आहे असंही आपल्याला अनेकांकडून ऐकायला मिळतं. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम, डाएटिंगकडे आता लोकांचा कल वाढला आहे; पण आता शास्त्रज्ञांनी लावलेल्या एका शोधामुळे दीर्घ आयुष्य जगण्याचं माणसांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. एका अद्वितीय शोधामुळे माणूस 120 वर्षांपर्यंत जगू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. एका भारतीय शास्त्रज्ञाने दीर्घायुष्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. या आश्चर्यकारक शोधामुळे माणसाने विज्ञानाच्या जगात फक्त एक पाऊल पुढं टाकलं आहे असं नाही, तर त्याचं आयुष्य वाढवण्याचीही आशा निर्माण झाली आहे. केंब्रिज विद्यापीठातले (Cambridge University) तज्ज्ञ सर शंकर बालसुब्रमण्यम (Sir Shankar Balasubramaniam) यांनी मानवी जनुकाशी (human genome) संबंधित एक विशेष शोध लावला आहे. त्यांनी जेनेटिक सिक्वेन्सिंगचा (gene sequencing) एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. या शोधामुळे डॉक्टरांना कोणत्याही रोगाचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान करता येऊन शकतं. त्यामुळे त्या रोगावर उपचार केले जाऊन आजार बरा होऊ शकतो. याद्वारे एखाद्या व्यक्तीचं आयुष्यदेखील वाढेल. हे वाचा -  हेल्दी म्हणून दिवसभर प्यायची एनर्जी ड्रिंक, तरुणीची झाली भयंकर अवस्था डीएनएपासून बनलेल्या अतिसूक्ष्म संरचनांना जनुकं म्हणतात. ही जनुकं आनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातात. जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे डॉक्टर कोणत्याही व्यक्तीची जनुकं तपासू शकतात आणि त्याचा रोग खूप आधी शोधू शकतात. जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे कोणत्याही जीवाच्या जनुकांची चाचणी करून त्याबद्दल अधिक माहिती मिळवणं. जीनोम सिक्वन्सिंगद्वारे मुलांच्या जनुकांचं परीक्षण करून त्यांच्यामधलं बौद्धिक अपंगत्वदेखील शोधलं जाऊ शकतं. ही जीनोम सिक्वेन्सिंगची केवळ सुरुवात आहे; मात्र या शोधामध्ये अधिक संशोधन करून माणसाचं आयुष्य वाढवलं जाऊ शकतं. सर शंकर यांनी लावलेला हा शोध पुढच्या पिढीतल्या जीनोम सिक्वन्सिंगसाठी एक मार्ग असेल. या शोधाद्वारे डॉक्टर मानवी डीएनएचं (DNA) पूर्वीपेक्षा अधिक चांगलं आकलन करू शकतात. या शोधाबाबत सर शंकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, मानवी जनुकांची मुख्य सांकेतिक अक्षरं A, C, T आणि G ही आहेत आणि ती या नवीन शोधाद्वारे वाचली जाऊ शकतात. तो काळ दूर नाही जेव्हा आपण केवळ जीनोम सिक्वेन्सिंगद्वारेच नव्हे तर एपिजेनोम सिक्वेन्सिंगद्वारेही रोगनिदान करण्यात सक्षम होऊ. हे वाचा -  ‘कुछ तो लोग कहेंगे’; लोकांचं सोडा, चांगल्या आयुष्यासाठी या गोष्टींवर करा फोकस केंब्रिज एपिजेनेटिक्स ही सर शंकर यांची कंपनी या शोधामुळे कोणत्याही रुग्णाच्या जनुकांचा अभ्यास करू शकेल आणि त्याच्या रोगासाठी वेगवेगळी औषधं बनवू शकेल. काळानुसार जीनोम सिक्वेन्सिंगच्या क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. डेली स्टारच्या वृत्तानुसार, जीनोम सिक्वेन्सिंगवर पहिल्यांदा 2000 साली संशोधन करण्यात आलं. 10 वर्षांच्या संशोधनासाठी एकूण 1 अब्ज डॉलरचा खर्च झाला; पण 2021 मध्ये 48 मानवी जीनोमवर फक्त 48 तासांत प्रक्रिया करण्यात आली, ती सुद्धा फक्त 1 हजार डॉलर्स खर्च करून.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात