Home /News /lifestyle /

BREAKING लंडनहून भारतात आलेल्या विमानात सापडले 5 कोरोना पॉझिटिव्ह

BREAKING लंडनहून भारतात आलेल्या विमानात सापडले 5 कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये (UK) कोरोना विषाणूचा नवा अवतार (Mutated Coronavirus strain in UK) सापडल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

    अहमदाबाद, 22 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (UK) कोरोना विषाणूचा नवा अवतार (Mutated Coronavirus strain in UK) सापडल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अनेक राष्ट्रांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रद्द केली आहेत. या देशात जायला आणि तिथून आलेल्या प्रवाशांना देशात प्रवेश करायला मनाई केली आहे. भारतानेही सोमवारपासून 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. या बंदीपूर्वी भारतात आलेल्या प्रवाशांची काटेकोट तपासणी होत आहे आणि त्यातून अहमदाबादला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. कोलकात्याला आलेले 2 प्रवासीसुद्धा पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे. लंडन अहमदाबाद फ्लाइटमध्ये 275 प्रवासी होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी (Covid-19 Test) विमानतळावरच करण्यात आली. त्यातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाकी प्रवाशांना घरी जायची परवानगी मिळाली. पण त्यांना पुढचे काही दिवस कोविड गाइडलाइन्सचं पालन करावं लागेल. त्यांना अन्य शहरात प्रवास करता येणार नाही आणि होम क्वारंटाइन व्हावं लागेल. भारतासह सगळं जग कोविड-19 शी (coronavirus) यशस्वी लढा देत असताना आता कोरोनानं केलेलं उत्परिवर्तन (mutation) नवीच डोकेदुखी बनून समोर येतं आहे. महाराष्ट्रातही हा अपडेट लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत. म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV - 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या