मुंबई 18 जुलै : योग्य पद्धतीने पाणी पिणं, हा अनेक रोगांवर असलेल्या घरगुती उपायांपैकी एक रामबाण उपाय ठरू शकतो. आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोमट पाणी पिणं हे सर्वोत्तम मानलं जातं. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी (Hot Water) पिऊन दिवसाची सुरूवात करावी, असं ज्येष्ठ मंडळी सांगतात. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जळून लघवीवाटे निघून जाते. तसंच सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी प्यायल्यानंतर आपल्याला फ्रेश (Fresh) वाटतं. त्वचा सुंदर दिसते, तसंच शरीर सुदृढ होतं, असं म्हणतात. लोक हेल्दी (Healthy) आणि फिट (Fit) राहण्यासाठी गरम पाणी पितात. खरं तर गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, त्याचे तोटेही आहेत. दिवसभर गरम पाणी पिणं, शरीरासाठी चांगलं नाही. आज आपण गरम पाण्यामुळे शरीराला काय नुकसान होतं, ते जाणून घेणार आहोत. रक्तात पाण्याचं प्रमाण वाढतं वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभर गरम पाणी पित असाल तर ही सवय लवकरात लवकर बदला. तज्ज्ञांच्या मते, दिवसभर गरम पाणी प्यायल्याने रक्तातील पाण्याचं प्रमाण वाढू लागतं, त्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. तुम्हाला इडली खाण्याचे हे 10 फायदे माहित आहेत का? पाहा काय सांगतात फिटनेस एक्सपर्ट किडनीवर दुष्परिणाम किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. तो विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करतो. किडनीची कार्यक्षमता पाण्यावर अवलंबून असते, परंतु जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. झोप न येणं रात्रीच्या वेळेस शरीरातील अन्न पचनाची शक्ती मंदावते. रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्याने अन्न व्यवस्थित पचतं आणि पचन संस्थेवरही त्याचा चांगला प्रभाव पडतो, असं म्हणतात. पण रिपोर्ट्सनुसार, जर रात्री झोपताना सतत गरम पाणी प्यायलं तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. तसंच जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावं लागू शकतं. जेवणाची मजा घेत आरोग्यही जपायचंय? मग या पद्धतीने चुकूनही खाऊ नका मीठ शिरा सुजणं तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला तहान लागली नसेल आणि तरीही तुम्ही गरम पाणी पित असाल तर तुमच्या शरीरातील शिरा सुजू शकतात. तसंच मेंदूच्या नसांनाही सूज येऊ शकते आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवसभरात गरम पाणी मर्यादित प्रमाणातच प्यावं. थंड, गरम किंवा कोमट पाणी शरीराच्या गरजेपुरतंच प्यायला हवं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी नुकसानदायक असतो. त्यामुळे गरम पाणी प्रमाणातच प्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.