मुंबई, 17 जुलै : जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या स्वयंपाकात मिठाचा वापर अपरिहार्य असतो. मात्र तुम्हाला माहित आहे की काही पद्धतींनी मिठाचे सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपण अनेकदा ऐकले असेल की, मीठ जास्त किंवा कमी प्रमाणात खाऊ नये. जास्त सेवन न करणे आणि अजिबात कमी करणे या दोन्हींचेही वेगवेगळे परिणाम आहेत. खरं तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात (Ideal Quantity Of Salt) मीठ खाणे गरजेचे असते. त्याचबरोबर जेवण तयार झाल्यानंतर त्यावर मीठ टाकून खाणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला चुकीच्या पद्धतीने मीठ खाल्यास काय दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती देणार आहोत. कमी प्रमाणात मीठ झाल्याचे दुष्परिणाम - शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सोडियम आवश्यक आहे. खूप कमी मिठाचे सेवन शरीरातील त्याचे प्रमाण कमी करू शकते. त्यामुळे रक्तदाब खूप कमी होण्याची शक्यता असते आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका असतो. - आपल्या शरीराला दररोज ठराविक प्रमाणात मिठाची गरज असते. जर तुम्ही खूप कमी मीठ खाल्ले तर शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्याचा धोका असतो. जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिन हार्मोनच्या सिग्नलला प्रतिसाद देतात तेव्हा असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोग होऊ शकतो. डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर - मधुमेहाच्या रुग्णाने योग्य प्रमाणात मीठ न घेतल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, टाईप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीजच्या रूग्णांसाठी कमी मीठ सेवन करणे खूप धोकादायक ठरू शकते. - शरीरात आवश्यकतेपेक्षा कमी मीठ खाल्ल्याने शरीरात थकवा आणि आळस राहतो. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करावेसे वाटत नाही आणि कोणतेही काम नीट करता येत नाही. जास्त प्रमाणात मीठ झाल्याचे दुष्परिणाम - कोणत्याही वयाच्या लोंकांनी जास्त प्रमाणात मीठ खाल्यास अनेक संशय निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्याही वाढू शकतात. याव्यतिरिक्त शरीरातील पातळीदेखील कमी होऊ शकते. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा - जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात ऍलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. असेही मानले जाते की, नियंत्रित प्रमाणात मीठ न खाल्यामुळे पोटाचा त्रासदेखील होऊ शकतो. - ज्या लोकांना आधीच काही गंभीर आजार असतील. जसे की, ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांनी जास्त प्रमाणात मीठ खाल्यास शरीरात हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी मीठ योग्य प्रमाणातच खावे आणि काहीही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







