मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे किती? तुम्ही अती पाणी तर पीत नाही ना, जाणून घ्या प्रमाण

भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे किती? तुम्ही अती पाणी तर पीत नाही ना, जाणून घ्या प्रमाण

शरीरात पाणी कमी झालं तर स्वादुपिंडाला सूज येते. त्यामुळेच पँक्रियाजच्या पेशी कायम हायड्रेट असणं आवश्यक असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं.

शरीरात पाणी कमी झालं तर स्वादुपिंडाला सूज येते. त्यामुळेच पँक्रियाजच्या पेशी कायम हायड्रेट असणं आवश्यक असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं.

योग्य आहाराबरोबर (Healthy diet) शरीराला पाणी (right amount of Water) अत्यंत आवश्यक आहे. किती पाणी दररोज प्यायलाच हवं? काय आहे योग्य प्रमाण जाणून घ्या..

मुंबई, 3 जून: पाणी (how much Water should be consumed daily) हे जीवन आहे. माणूस अन्न (Food and water) आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही. उन्हाळ्यामध्ये तहान लागल्यावर आपण भरपूर पाणी पितो (Drink plenty of water) मात्र, हिवाळा आणि पावसाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. खरं तर शरीराला एका ठराविक मात्रेमध्ये पाणी हवं असतं. मात्र बरेच जण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष (Ignore drinking water)करतात.

घसा ओला होण्यापुरता पाणी प्यायल्याने तहान भागते मात्र, शरीराची गरज पूर्ण होत नाही.  माणसाच्या शरीरामध्ये 60 ते 70 टक्के पाणी असतं. पाणी पोषक (Nutritious) घटक इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो याशिवाय शरीरात ऑक्सिजनची लेव्हल(Oxygen level) योग्य राहते.

पाणी पिण्याचे फायदे

शरीर हायड्रेड असेल तर, आपण जास्त वेळ एक्ससाईज आणि शारीरिक हालचाली करू शकतो. पाण्यामुळे स्नायू मजबूत राहतात. स्नायूंमधील आणि सांध्यामधील वेदना कमी होतात.

वजन कमी करायचा असेल तर भरपूर पाणी प्या. लो कॅलरीज असणारे कोणतेही ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

(इरफान खानने टिपले होते बाबिलचे काही खास क्षण, पाहा PHOTO)

पाणी मेटाबोलिजम वाढवतो आणि. शरीरात मेटाबोलिजम वाढून ऊर्जा वाढल्याने आपल्याला दिवसभर उत्साही वाटत राहतं.

आपला मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो. मेंदूंची ऊर्जा आणि क्षमता वाढते. मेंदूचा 75 ते 85 टक्के भाग हा पाण्यात असतो.

शरीरात योग्य प्रमाणामध्ये पाणी असेल तर विषाक्त पदार्थ बाहेर फिरता येतात

(लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत; 13 वर्षांचा संसार उद्धवस्त)

पाण्याचं प्रमाण

भरपूर पाणी प्यायल्यामुळे रोग आणि आजारांशी लढण्याची ताकद शरीराला मिळते. मात्र पाणी प्रमाणात पिणं महत्त्वाचं आहे. शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे असं समजून काही लोक पाण्याचं अतिसेवन करतात. ज्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्वाचं आहे.

(सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, 'हे' आहे कारण)

महिला आणि पुरुषांमध्ये पाण्याची गरज वेगळा

संशोधनानुसार असं समोर आलं आहे की, महिला आणि पुरुषांची पाण्याची गरज वेगवेगळी असते. महिलांना दररोज साडेअकरा ग्लास पाण्याची आवश्यकता असते म्हणजे, जवळपास तीन लिटर पाणी महिलांना आवश्यक आहे. तर पुरुषांना साडेपंधरा ग्लास म्हणजेच, जवळजळ 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते. दूध दही चहा कॉफी हे घेण्याने देखील शरीरामधील पाणी वाढतं.  मात्र कोणत्याही पातळ पदार्थांबरोबर पाण्याची तुलना होऊ शकत नाही.

First published:

Tags: Drink water, Health Tips, Water