जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, 'हे' आहे कारण

सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, 'हे' आहे कारण

सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, 'हे' आहे कारण

या फायनलसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) प्रचंड उत्साही होते. त्यांनी फायनल पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन टीम इंडियाला पाठिंबा देण्याची पूर्ण योजना तयार केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच (WTC Final 2021) 18 जूनपासून सुरू होणार आहे. या मॅचकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू गेल्या महिनाभरापासून या टेस्टची तयारी करत आहेत.  या फायनलसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) प्रचंड उत्साही होते. त्यांनी फायनल पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन टीम इंडियाला पाठिंबा देण्याची पूर्ण योजना तयार केली होती. मात्र गांगुलींनी इंग्लंडला जाण्याचा बेत आता रद्द केला आहे. सौरव गांगुलीच नाही तर बीसीसीआयचा (BCCI) कोणताही अधिकारी फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे क्वारंटाईनचे कडक नियम हे याचं कारण मानलं जात आहे. सौरव गांगुली, जय शहा किंवा कोणत्याही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट मिळणार नाही. साधरणपणे बोर्डाचे अधिकारी मॅच सुरु होण्याच्या काही दिवस आगोदर जातात. मात्र ईसीबीच्या नियमानुसार बीसीसीआयचे अधिकारी फायनल पाहण्यासाठी येणार असतील तर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन राहवे लागेल. स्टुअर्ट ब्रॉडला 14 वर्षानंतर मिळाली महत्त्वाची जबाबदारी, न्यूझीलंडविरुद्ध होणार परीक्षा भारताची पुरुष आणि महिला टीम 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होतील. महिला टीम इंग्लंडमध्ये एक टेस्ट 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅच खेळणार आहे. तर विराट कोहलीची (Virat Kohli) टीम 18 जून रोजी होणाऱ्या फायनल मॅचनं या दौऱ्याची सुरुवात करेल. या सामन्यानंतर दीड महिना भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहिल. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड **(**India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात