जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Navratri 2022 : नवरात्रीच्या गरब्यात चमकायचंय? त्वचेच्या उजळपणासाठी वापरा 'हे' 5 घरगुती फेसपॅक!

Navratri 2022 : नवरात्रीच्या गरब्यात चमकायचंय? त्वचेच्या उजळपणासाठी वापरा 'हे' 5 घरगुती फेसपॅक!

फेस पॅक

फेस पॅक

नवरात्रातला गरबा म्हणजे तरुण-तरुणींसाठी पर्वणीच असते. म्हणूनच या गरब्याला जाण्याआधी या 5 फेसपॅकचा नक्की वापर करा

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 सप्टेंबर : आपण चांगलं दिसावं, आकर्षक दिसावं असं अनेकांना वाटतं. मार्केटमध्ये दिवसागणिक विविध कॉस्मेटिक उत्पादनं आपल्याला दिसतात. सण-उत्सव म्हटलं, की अनेकजण आकर्षक दिसण्याकरिता विविध उपाय करतात. विशेषकरून महिला वर्ग पार्लरमध्ये जातोच. काही जण चांगलं दिसण्यासाठी घरगुती उपायही करतात. कुणी भुवया कोरून घेतात, कुणी केस सुंदर दिसावेत यासाठी प्रयत्न करतात. अनेक जण त्वचा उजळ आणि डागरहित दिसावी यासाठी फेसपॅक वापरतात. सणासुदीच्या दिवसात दिसण्यावर अधिक भर दिला जातो. नवरात्रौत्सव आलाय. नवरात्र म्हटलं की गरबा आलाच. गरब्याला जाताना आपण आकर्षक दिसावं असं अनेक तरुण-तरुणींना वाटतं. त्वचेच्या उजळपणासाठी कोणते घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात, त्याची माहिती घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘वेबदुनिया हिंदी’ने दिलं आहे. नवरात्रातला गरबा म्हणजे तरुण-तरुणींसाठी पर्वणीच असते. म्हणूनच या गरब्याला जाण्याआधी या 5 फेसपॅकचा नक्की वापर करा. तुम्ही सुंदर, आकर्षक दिसाल हे नक्की. चारोळी फेसपॅक चारोळी घरात असतेच. चारोळी वाटल्यावर त्या पावडरमध्ये कच्चं दूध, हळद, काही थेंब लिंबाचा रस, मध घाला. या मिश्रणाचा लेप तयार करा. हा फेसपॅक तुम्ही किमान 20 मिनिटं ते 1 तासापर्यंत चेहर्‍यावर ठेवा. हा लेप काहीसा सुकल्यावर पाण्याने तोंड स्वच्छ धुवावं. असं केल्यास त्वचेचा उजळपणा तुम्ही नक्कीच अनुभवाल. हेही वाचा - Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEO बेसन आणि बटाटामिश्रित फेसपॅक बेसनात बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळावा. चिमूटभर हळद घालून लेप तयार करा. हा लेप लावून ठेवा आणि अर्ध्या तासानं तोंड धुवावं. हळूहळू तुमचा चेहरा उजळलेला दिसेल आणि स्किनवर तकाकी दिसून येईल. उटणं गरब्याला गेल्यावर लोकांनी आपल्याकडे पाहावं असं अनेकांना वाटतं. यासाठी बेसन किंवा चण्याच्या डाळीच्या पिठात हळद, बदामची पेस्ट आणि कच्चं दूध यांचं मिश्रण तयार करून उटणं लावा. हे मिश्रण 15-20 मिनिटं तुमच्या चेहर्‍यावर राहणं गरजेचं आहे. यानंतर यावर पाण्याचा शिडकावा करून थोडा वेळ त्वचेवर चोळा किंवा मसाज करा. त्यानंतर हा फेसपॅक पाण्याच्या साह्याने काढून टाका. हे असं दररोज केल्याने तुमची त्वचा उजळ दिसू शकते. मसूर डाळ फेसपॅक रात्री झोपण्यापूर्वी दुधात मसूर डाळ भिजवावी. सकाळी ती वाटून घ्यावी. तयार झालेला लेप चेहर्‍यावर लावावा. हा लेप सुकल्यावर पाण्याने तोंड धुवावं. हा उपाय केल्यास त्वचेच्या गोरेपणात आणि उजळपणात चांगला फरक दिसून येईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मिक्स फेसपॅक बेसन किंवा चण्याच्या डाळीच्या पिठात काकडीचा रस, संत्र्याचा रस आणि टोमॅटोचा रस मिसळून हा लेप तुमच्या त्वचेवर लावा. लेप जोपर्यंत सुकत नाही, तोपर्यंत तसाच ठेवा. लेप पूर्णपणे सुकल्यावर पाण्याच्या साह्याने तो काढून टाका. यानंतर त्वचेच्या रंगात फरक जाणवेल. तसंच त्वचेवरचे डाग जाऊन तकाकी येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात